मोदींनंतर थलैवा रजनीकांत गाजवणार 'Man Vs Wild'!; शूटींगला सुरवात

वृत्तसंस्था
Tuesday, 28 January 2020

प्रसिद्ध निवेदक व 'मॅन व्हर्सेस वाईल्ड'चा सूत्रधार बेअर ग्रिल्स सध्या कर्नाटकातल्या बंदीपूर अभयारण्यात शूटींगसाठी आला आहे. त्याच्यासह रजनीकांतही बंदीपूर अभयारण्यात पोहोचले.

बंगळूर : थलैवा रजनीकांत नेहमीच आपल्या स्वॅगमुळे चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आलाय तो एका हटके कारणाने! डिस्कव्हरी चॅनेलचा प्रसिद्ध 'मॅन व्हर्सेस वाईल्ड' या कार्यक्रमात आता दस्तुरखुद्द रजनीकांत झळकणार आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती. आता रजनीकांत या कार्यक्रमात दिसणार म्हणून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

प्रियांकाचा 'तो' हॉट ड्रेस, 20 वर्षांपूर्वीची 'या' अभिनेत्रीची फॅशन

प्रसिद्ध निवेदक व 'मॅन व्हर्सेस वाईल्ड'चा सूत्रधार बेअर ग्रिल्स सध्या कर्नाटकातल्या बंदीपूर अभयारण्यात शूटींगसाठी आला आहे. त्याच्यासह रजनीकांतही बंदीपूर अभयारण्यात पोहोचले. सध्या या एपिसोडचे शूटींग सुरू आहे. याआधी लोकसभा निवडणूकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मॅन व्हर्सेस वाईल्ड' या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. जीम कॉर्बेट या राष्ट्रीय उद्यानात हा एपिसोड शूट करण्यात आला होता. त्यावेळी मोदी व ग्रिल्सने अनेक साहसी दृश्य साकारली होती. आता मोदींनंतर थेट रजनीकांत या शोमध्ये दिसणार असल्याने थलैवाचे चाहते खूश आहेत. 

आमिरच्या 'त्या' रिकवेस्टमुळे खिलाडी कुमारने बदलली रिलिज डेट

रजनीकांतचं फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. त्याचे चाहते त्याच्यासाठी प्रचंड वेडे आहेत. 'मॅन व्हर्सेस वाईल्ड'मध्ये रजनीकांत आहे हे कळताच काही वेळातच सोशल मीडियावर त्याचा ट्रेंड व्हायरल होत आहे. रजनीकांत व बेअर ग्रिल्स यांचा हा एपिसोड कधी प्रदर्शित होईल याची अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, दोन वाघ एकमेकासंमोर बघायला मिळणार अशा हटके पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajinikanth will play important role in Man vs Wild show