आमिरच्या 'त्या' रिकवेस्टमुळे खिलाडी कुमारने बदलली रिलिज डेट

वृत्तसंस्था
Monday, 27 January 2020

आमिर खानचा 'लाल सिंग चढ्ढा' हा आगामी चित्रपट 25 डिसेंबर 2020 ला रिलिज होणार आहे. हे दोन्ही चित्रपट एकाच वेळी टक्कर देणार असल्याने आमिरने अक्षयला त्याच्या चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली.

मुंबई : 2020 हे वर्ष प्रेक्षकांसाठी नक्कीच खास आहे कारण मनोरंजनाची मेजवानी त्यांना मिळत आहे. एका मागोमाग एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामध्ये अऩेकदा असे होते की, मोठ्या सेलिब्रिटींचे चित्रपट बॉक्सऑफिसवर क्लॅश होतात. याचा अर्थ असा की, ते एकाच वेळी रिलिज होणार असल्याने दोन्ही चित्रपटांचे नुकसान होते. अशावेळी अनेकदा वाद होतात तर, अनेकदा बॉलिवूडमधील ही सेलिब्रिटी मंडळी मग, चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करतात. अशीच एक रिकवेस्ट आमिर खानने केली होती. जाणून घ्या त्याच्या या प्रयत्नांना यश आले का ?

वाचा : प्रियांकाच्या 'या' फोटोंमुळे सोशल मिडीयावर जलवा...

शुक्रवारी चित्रपट रिलिज होतो. अशामध्ये दोन मोठ्या चित्रपटांची टक्कर होण्याची शक्यता असते. हे नुकसान टाळण्यासाठी आमिरने बॉलिवूडच्या खिलाडी कुमारला एक विनंती केली. त्याचं झालं असं की, अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' या चित्रपटाचा पोस्टर त्याने मागिल वर्षी 2019 मध्ये रिलिज केला होता. यावर्षी 2020 च्या ख्रिसमसमध्ये हा चित्रपट रिलिज होणार असल्याची माहिती त्याने या पोस्टरद्वारे दिली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Sat Sri Akaal ji, myself Laal...Laal Singh Chaddha.

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan) on

आमिर खानचा 'लाल सिंग चढ्ढा' हा आगामी चित्रपट 25 डिसेंबर 2020 ला रिलिज होणार आहे. हे दोन्ही चित्रपट एकाच वेळी टक्कर देणार असल्याने आमिरने अक्षयला त्याच्या चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली. या विनंतीचा मान राखत अक्षयने मोठ्या दिलाने तारीख पुढे केली आहे. अक्षय कुमार आणि साजिद नाडियादवाला यांनी 'बच्चन पांडे' ची तारीख पुढे केल्याची जाहीर केली आहे. 

वाचा : मी मुस्लिम, पत्नी हिंदू आणि मुले हिंदुस्तानी : शाहरुख

आमिरने अक्षयचे आभार मानत त्याविषयीचं एक ट्विट केलं आहे. यामध्ये आमिर म्हणाला,'' कधीकधी फक्त बोलणं पुरेसं असतं. माझा मित्र अक्षय कुमार आणि साजिद नाडियादवाला यांचे खूप आभार. माझ्या विनंतीखातर त्यांनी 'बच्चन पांडे' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे केली आहे. त्यांच्या चित्रपटासाठी शुभेच्छा. प्रेम.'' याला रिप्लाय देताना अक्षय म्हणाला, '' काहीच हरकत नाही आमिर, आपण सर्व इथे मित्रच आहोत.''

'बच्चन पांडे' मध्ये अक्षय मुख्य भूमिका साकारणार आहे तर, त्याच्यासोबत अभिनेत्री क्रिती सॅनन दिसणार आहे. आमिरच्या 'लाल सिंग चढ्ढा' मध्ये त्याच्यासोबत करीना कपूर खान दिसणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akshay Kumar shifts his release date of Bachchan Pandey on Aamir Khans request