एक असं युद्ध ज्याने बदलला इतिहास, 'पानिपत' चा पोस्टर रिलिज

panipat movie poster is out
panipat movie poster is out

मुंबई : गेल्या बऱ्याच महिन्य़ांपासून 'पानिपत' य़ा चित्रपटाची बि- टाउनमध्ये चर्चा आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित पानिपत चित्रपटाचा पोस्टर अखेर प्रदर्शित झाला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या पोस्टरला प्रेक्षकांनी चागंलाच प्रतिसाद दिला आहे. या पोस्टरसह चित्रपटाची रिलिज डेट समोर आली आहे. इतिहासातला हा मोठा पराभव कायमचा अजरामर झाला आणि तो प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 

विशेष म्हणजे आशुतोष गोवारीकर तब्बल तीन वर्षांनंतर नव्या चित्रपटासह कमबॅक करणार आहे. 14 जानेवारी 1761 या दिवशी लढल्या गेलेल्या पानिपतच्या युद्धाची कथा दिग्दर्शक गोवारीकर घेऊन येत आहे. हा सिनेमा येत्या 6 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अर्जुन कपूर, संजय दत्त, क्रिती सॅनन अशी दमदार कास्ट दिसणार आहे. मुख्य भूमिकेतला अर्जुन सदाशिवरावांच्या भूमिकेत झळकणार आहे तर, संजय दत्त अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत दिसणार आहे. पद्मीनी कोल्हापुरेसुद्धा या चित्रपाटमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अर्जुन कपूरने ट्विटवर पहिला पोस्टर अपलोड करत, 'ज्या युद्धाने इतिहास पालटला, त्याचे साक्षीदार व्हा', असं कॅप्शनही दिलं आहे. 

इतिहासातील एका मोठ्या युद्धावर आधारीतल असलेला हा चित्रपट भव्य दिव्य असणार आहे. सुनीता गोवारीकर आणि रोहित शेलटकर यांनी चित्रपटाचं निर्देशन केलं आहे. 'एक असं युद्ध ज्याने इतिहास बदलला' अशी टॅगलाईन चित्रपटाच्या पोस्टरमध्ये देण्यात आली आहे. आशुतोष गोवारीकर यांनी 2016 मध्ये आलेल्या 'मोहेंजोदारो' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. बॉक्सऑफीसवर या चित्रपटाने खास कमाई केली नाही. मराठी संगीतातील टॉपचे गायक अजय-अतुल या चित्रपटाला संगीत देणार आहेत. याआधी 'धडक' चित्रपटालाही अजय-अतुल यांनी संगीत दिलं होतं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com