उर्मिला-आदिनाथ कोठारेत बिनसलं? दोन महत्त्वाच्या कारणांमुळे रंगली चर्चा Urmila Kothare | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urmila And Adinath Kothare

उर्मिला-आदिनाथ कोठारेत बिनसलं? दोन महत्त्वाच्या कारणांमुळे रंगली चर्चा

मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते महेश कोठारे(Mahesh Kothare) यांचा मुलगा आदिनाथ कोठारे(Adinath Kothare) यानं २०११ मध्ये अभिनेत्री उर्मिला कानिटकरशी(Urmila Kanitkar-Kothare) लग्न केलं होतं. अर्थात या दोघांचे सूत जुळलं ते महेश कोठारे यांच्या 'शुभमंगल सावधान' या सिनेमाच्या सेटवर. ज्याची निर्मिती आणि दिग्दर्शनाची धूरा महेश कोठारे यांच्यावर असल्यानं आदिनाथही तिथे दिग्दर्शनाचे धडे घेत होता. उर्मिलाचा हा पहिलाच सिनेमा होता. या सिनेमामुळे आदिनाथसोबत उर्मिलाची छान मैत्री झाली,त्यानं तिला प्रपोज केलं आणि मग एक दोन वर्षात दोघांनी स्वतःचं 'शुभमंगल' उरकलं. त्यानंतर मात्र या दोघांचा संसार सुखाचा सुरु होता. यांना एक छान गोंडस मुलगी देखील आहे,जी आता चार एक वर्षांची असेल,तिचं नाव आहे जीजा. हे त्रिकोणी कुटुंब अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यामतून आनंदात असलेलं दिसतं अनेकदा. उर्मिला-आदिनाथ मुलीसोबतचे फोटो-व्हिडीओ शेअर करत असतात.

हेही वाचा: जयपूर हिंसाचारावर कंगनाची 'बुल्डोझर' कमेंट; म्हणाली...

लग्नानंतर उर्मिलानं इंडस्ट्रीपासून दुरावा साधला होता. घरचं प्रॉडक्शन हाऊन असूनही ती अभिनयापासून तशी लांब राहिली. अधनंमधनं दिसायची ती सिनेमातून पण तसं फारसं काम तिनं केलं नाही. तिनं आपल्या नृत्य कलेवर लक्ष केंद्रित केल्याचं दिसून आलं होतं. कोठारे व्हिजन या त्यांच्या होम प्रॉडक्शन मध्ये महत्त्वाची जबाबदारी नावापुरती तिच्याकडे असायची पण तिथेही वैयक्तिक रित्या फारशी ती रमलेली दिसलीच नाही. पण आता अचानक अनेक वर्षांनी उर्मिलानं छोट्या पडद्यावर पदार्पण करायचं ठरवलं. आणि 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतून महत्वाच्या भूमिकेत ती दिसू लागली. आता चर्चा होतेय की घरचं प्रॉडक्शन हाऊस असताना इतक्या वर्षांनी उर्मिला दुसऱ्या प्रॉडक्शन हाऊसच्या मालिकेतून पुर्नपदार्पण का करतेय? याचं अद्याप कोणतं स्पष्टिकरण प्रश्न विचारुनही उर्मिलाकडून आलेलं नाही. किंवा ती यावर बोलणं टाळते असं दिसून येत आहे. यामुळेच आता वेगळी चर्चा रंगलेली दिसून आली आहे. उर्मिला-आदिनाथमध्ये काही तरी बिनसल्याची. आणि हे ऐकून त्यांच्या चाहत्यांना मात्र थोडा धक्का बसला आहे.

केवळ उर्मिलानं दुसऱ्या प्रॉडक्शन हाऊसमधनं पुन्हा काम करायचं ठरवलं म्हणूनआदिनाथसोबत तिचं बनसलं आहे असं पटकन म्हणता येणार नाही. पण आता आणखी एक दुसरं महत्त्वाचं कारण समोर आलंय ज्यानं यांच्यात बिनसल्याच्या बातमीला थोडा आणखी जोर धरला आहे. उर्मिलाचा ४ मे रोजी वाढदिवस झाला. आदिनाथ नेहमीच याआधी बायकोच्या वाढदिवशी तिला शुभेच्छा देताना किंवा दोघे एकत्र सेलिब्रेशन करताना अनेक फोटो-व्हि़डीओ-पोस्ट करताना दिसायचा पण यावर्षी मात्र तसं काहीच आदिनाथनं केलं नसल्याची चर्चा आहे. त्यानं बायकोच्या वाढदिवशी एकही शुभेच्छा देणारी साधी पोस्टही केलेली दिसून आली नाही. आणि इथच त्यांच्या बिनसल्याच्या बातमीला आणखी खतपाणी मिळालं, आता यावर अधिकृत रित्या कोणतीही बातमी समोर आली नसली तरी या दोन कारणांनी चाहत्यांच्या मनात मात्र शंका येऊ लागली असेल हे निश्चित. आता यांच्या सुखी संसारात सगळं आलबेल असो ही प्रार्थना मात्र आपण निश्चित करू शकतो.

हेही वाचा: बिकिनीत आयरा तर शर्टलेस आमिर, बर्थे डे पार्टीतील बाप-बेटीचा 'तो' फोटो ट्रोल

आदिनाथ सध्या 'चंद्रमुखी'(Chandramukhi) या सिनेमामुळे भलताच चर्चेत आहे. तर उर्मिला तिच्या 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेमुळे अभिनय विश्वात परत आल्यानं तिचे चाहतेही खूप खूश आहेत. आता यांच्या करिअर प्रमाणे यांचा संसारही 'बिनसल्याच्या' नाही तर सगळं सुरळीत सुरू आहे या बातमीनं चर्चेत येवो,ही मनापासून इच्छा.

Web Title: Urmila Adinath Kothare Dispute Two Important Reasons Behind

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top