प्रभास - अनुष्का परत एकत्र 

वृत्तसंस्था
बुधवार, 7 जून 2017

"बाहुबली'च्या दुसऱ्या भागाने करोडोंचा गल्ला जमावला आणि सगळेच रेकॉर्डस मोडीत काढले. या चित्रपटात सगळ्यात जास्त लोकांना भावली ती अमरेंद्र बाहुबली (प्रभास) आणि देवसेना (अनुष्का शेट्टी) यांची जोडी.

"बाहुबली'च्या दुसऱ्या भागाने करोडोंचा गल्ला जमावला आणि सगळेच रेकॉर्डस मोडीत काढले. या चित्रपटात सगळ्यात जास्त लोकांना भावली ती अमरेंद्र बाहुबली (प्रभास) आणि देवसेना (अनुष्का शेट्टी) यांची जोडी.

त्यांच्या फेसबुक, ट्‌विटरवरच्या फोटोंना करोडो लोकांचे लाईक्‍स मिळाले आहेत. या दोघांनी सगळ्यांचीच मने जिंकून घेतली. या दोघांचे अफेअर आहे अशाही बातम्या पसरल्या होत्या. पण, अनुष्काने या सगळ्यावर स्पष्टीकरण देत असं काहीही नसल्याचा खुलासा केला. त्यानंतर प्रभास एका नामवंत उद्योपतीच्या मुलीशी लग्न करणार असल्याची चर्चा सुरू होती; पण त्यातही काही तथ्य नसल्याचं स्पष्ट झालंय. या दोघांची एवढी लोकप्रियता पाहून 2009 मध्ये या दोघांनी एकत्र काम केलेला चित्रपट "बिल्ला'चे निर्माते हा चित्रपट हिंदीमध्ये डब करणार असल्याचं समजतंय. या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीचं नाव "द रिटर्न ऑफ रिबेल 2' असं असणार आहे. हा चित्रपट ऍक्‍शन थ्रिलर होता. साऊथमध्ये हा चित्रपट खूप गाजला होता. त्यामुळे अनुष्का आणि प्रभास परत एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. प्रभास सध्या त्याच्या आगामी "साहो' चित्रपटाच्या तयारीत आहे. लवकरच त्याचा हा चित्रपटही प्रदर्शित होईल. 

Web Title: prabhas and anushka back together