कोरोनाच्या संकटात धावला 'बाहुबली' ; चित्रपटाचा सेट रुग्णालयाला

चित्रपटाचा सेट रूग्णालयांना दान करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
prabhas
prabhas Team esakal

मुंबई- कोरोनाच्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण झाला आहे. अशा वेळी अनेक रूग्णांना वेळेवर वैद्यकिय सुविधा मिळत नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी कोरोना रूग्णांसाठी मदत कार्य हाती घेतले आहे. रूग्णांवर वेळेवर उपचार होण्यासाठी आणि त्यांना कोणता त्रास होऊ नये यासाठी अनेक कलाकार मदत करत आहेत. नुकताच प्रभासच्या (prabhas) 'राधे श्याम' (radhe shyam) या चित्रपटाच्या निर्मात्यांनी कोरोना रूग्णांच्या मदतीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. 'राधे श्याम' या चित्रपटाचा सेट हा कोट्यवधी रूपये खर्च करून तयार करण्यात आला आहे. हा सेट रूग्णालयांना दान करण्याचा निर्णय या चित्रपटाच्या निर्मात्यांनी केला आहे.(prabhas film radhe shyam filmmakers donate set property for hospital)

राधे श्याम चित्रपटामध्ये इटलीमधील 70च्या दशकातील हॉस्पिटल दाखवण्यात येणार आहे. या हॉस्पिटच्या सेटमध्ये वापरण्यात आलेले 50 बेड, स्ट्रेचर, पीपीई किट्स, वैद्यकिय साधने, ऑक्सिजन सिलिंडर या सर्व गोष्टी हैद्राबादमधील एका खाजगी रूग्णालयात देण्यात आल्या आहेत. या चित्रपटाचे शूटिंग पुर्ण झाल्यानंतर या हॉस्पिटलचा सेट जेव्हा हटवण्यात आला तेव्हा तो एका गोदामात ठेवण्यात आला होता. रूग्णालयांमधील वैद्यकिय सुविधांचा तुटवडा पाहता निर्मात्यांनी हा सेट 9 मोठ्या ट्रकमधून हैद्राबादमधील रूग्णालयांना दिला. राधे श्यामच्या निर्मात्यांचे हे कार्य पाहून अनेकांनी सोशल मीडियावर त्यांचे कौतुक केले आहे.

prabhas
सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरलाही झाला कोरोना
prabhas
लशीच्या दोन डोसनंतरही अभिनेते मोहन जोशी यांना कोरोना

राधे श्याम या चित्रपटाचे दिग्दर्शन राधाकृष्ण कुमार यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये प्रभास, भाग्यश्री आणि पूजा हेगडे हे कालाकर प्रमुख भुमिकेत दिसणार आहेत. 30 जुलै रोजी राधे श्याम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामधील प्रभास आणि पुजाची जोडी पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com