प्रभासची मागणी एेकून करणचे फिरले डोळे!

गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

बाहुबली या चित्रपटातून प्रभास घराघरांत पोचला. त्याची लोकप्रियता पाहता त्याला दक्षिणेतून हिंदी सिनेसृष्टीमध्ये आणण्यासाठी हिंदी निर्माते आतुर असणार हे तर ओघाने आलंच. प्रभासलाही हिंदी सिनेमात झळकायचं आहे. त्यासाठी मात्र त्याने सांगितलेलं मानधन एेकून धर्मा प्राॅडक्शनच्या करण जोहरनेही त्याला लाॅंच करण्याचा बेत रद्द केला. 

मुंबई :  बाहुबली या चित्रपटातून प्रभास घराघरांत पोचला. त्याची लोकप्रियता पाहता त्याला दक्षिणेतून हिंदी सिनेसृष्टीमध्ये आणण्यासाठी हिंदी निर्माते आतुर असणार हे तर ओघाने आलंच. प्रभासलाही हिंदी सिनेमात झळकायचं आहे. त्यासाठी मात्र त्याने सांगितलेलं मानधन एेकून धर्मा प्राॅडक्शनच्या करण जोहरनेही त्याला लाॅंच करण्याचा बेत रद्द केला. 

करण जोहर आणि बाहुबली यांचं नातं जुनं आहे. बाहुबलीचा आलेला दुसरा भाग हा करण जोहरने हिंदीत वितरित केला होता. त्याचा त्याला मोठा फायदा झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने करणची प्रभासशी ओळख झाली. ही ओळख वाढली. पुढे प्रभासला हिंदीतून काही आॅफर येऊ लागल्या. चाणाक्ष करणने त्याचं हिंदीतलं वजन वापरून प्रभासला लाॅंच करण्याची तयारी दाखवली. पण प्रभासने सांगितलेलं मानधन एेकून करणने तो बेत रद्द केला. कारण प्रभासने सांगितलेली ही रक्कम रजनीकांतपेक्षा जास्त आहे असा दावा धर्मा प्राॅडक्शनने केला आहे. 

नाव न सांगण्याच्या अटीवर धर्मामधल्या एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार प्रभासने हिंदीत येण्यासाठी तब्बल 20 कोटी रुपयांच्या मानधनाची अपेक्षा केली आहे. यावर पुढे बरंच काथ्याकूट झालं. पण प्रभास काही मागे हटेना. रजनीकांतही हिंदीत काम करणार असतील तर इतकी रक्कम मागत नाहीत, असं धर्मा प्राॅडक्शनतर्फे सांगण्यात आलं आहे. त्याची ही रक्कम एेकून करणने त्याला दिलेली लाॅंचिंगची आॅफर रद्द केली. 

प्रभासचा आता साहो हा चित्रपट रिलीज होतोय. त्यात श्रद्धा कपूर त्याच्यासोबत आहे. हा चित्रपट हिंदीसह तेलुगु, तमीळ भाषेत रिलीज होणार आहे. 

Web Title: prabhas karan johar bollywood esakal news