
Prajakta Koli : बाबा कॅडबरीच्या कंपनीत काम करायचे आता मी त्याच कंपनीच्या... ; प्राजक्ताच्या डोळ्यात पाणी!
Prajakta Koli : शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या अनेक यशस्वी कथा आपण वाचल्या व ऐकल्या आहेत. अशीच एका मराठमोळ्या मुलीच्या यशाची कथा सध्या चर्चेत आली आहे. प्रत्येक बापाला अभिमान वाटावा, अशी ही बातमी आहे. फार कमी काळात आणि फार कमी वयात मिळवलेलं बेसुमार यश म्हणजेच 'प्राजक्ता कोळी'. प्राजक्ताने युट्यूब क्विन ते बॉलिवूड असा टप्पा गाठला आहे. बॉलिवुडमधील दिग्गजांनी तिच्या यशाचे कौतुक केले आहे.
प्राजक्ताने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टवर अनुष्का शर्मा, सुनिल शेट्टी, नेहा कक्कर, अनन्या पांडे व अनेक दिग्गज कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. प्राजक्ता कोळीचे बाबा कॅडबरीच्या कंपनीत शिफ्टमध्ये काम करायचे आता त्याच कंपनीची प्राजक्ता कोळीने जाहिरात केली आहे. त्यामुळे प्राजक्ता भावूक झाली आहे. प्राजक्ताने जाहिरातीचे काही फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचे आई-बाबा देखील दिसत आहे.
प्राजक्ता म्हणाली, मी जेव्हा पाच वर्षाची होती तेव्हा बाबा कॅडबरी कंपनीत डबल शिफ्टमध्ये काम करत होते. आजही बाबा स्वयंपाक घरात असतांना खूप वेगात काम करता असे मी म्हणते. यावर ते आजही उत्तर देतात, "मी एक कॅन्टीन कामगार आहे, बाळा! माझ्याकडे गप्प बसायला वेळ नाही. अनेकांना खायला घालायचे आहे.
प्राजक्ता म्हणाली, "मला योग्य शिक्षण, पोषण, शिष्टाचार आणि महत्त्वाकांक्षा देण्यासाठी माझे पालक दररोज काम करताना मी पाहिले. अनेक-अनेक विचित्र नोकऱ्या केल्या. पण बाबांचा कॅडबरीतील कार्यकाळ नेहमीच खास होता. प्रत्येक दिवाळी बोनससह घरी येणारा चॉकलेट ट्रे नेहमीच खास असेल."
"मी काल रात्री माझ्या आईवडीलांच्या चेहऱ्यावर हसू पाहीले. जेव्हा त्यांनी मला कॅडबरीच्या जाहिरात पोस्टरवर मला पाहीले. हे माझ्यासाठी खूप खास आणि अस्विमरणीय होते. या जीवनाबद्दल आणि ते देत असलेल्या सर्व गोष्टींसाठी मी कृतज्ञ असेल. तुमच्यासाठी कृतज्ञासाठी आभारी", असे प्राजक्ता म्हणाली.