'हिच्यावर वेळीच लक्ष द्या नाहीतर ही.. ', वहीदा रहमानच्या 'या' हरकतीला वैतागले होते वडीलWaheeda Rehman | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Waheeda Rehman

Waheeda Rehman: 'हिच्यावर वेळीच लक्ष द्या नाहीतर ही.. ', वहीदा रहमानच्या 'या' हरकतीला वैतागले होते वडील

Waheeda Rehman: बॉलीवूड अभिनेता अरबाज खानचा चॅट शो 'द इनविंसिबल्स' च्या नव्या एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला आहे. यावेळी अरबाजच्या शो मध्ये हिंदी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री वहीदा रहमान यांना निमंत्रित करण्यात आलं होतं.

वहीदा रहमानने अरबाजसोबत संवादा दरम्यान आपल्या सुरुवातीच्या दिवसांविषयी बातचीत केली. त्यांनी खुलासा केला की त्यांचे वडील त्यांच्या काही हरकतींमुळे खूप त्रासले होते..चिंतेत पडले होते.

आता प्रश्न हा उठतो की वहीदा रहमान असं काय करायच्या की ज्याच्यामुळे त्यांचे वडील चिंतेत पडले होते? चला जाणून घेऊया..(Waheeda Rehman spoke about her bollywood journey in arbaaz khan chat show)

प्रोमोच्या सुरुवातीला अरबाज खान वहीदा रहमान यांना विचारताना दिसतोय की,'तुम्ही कधी आपल्या परफॉर्मन्सची प्रॅक्टिस आरशासमोर केली होती का?' या प्रश्नाचं उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली,''हो खूप वेळा. माझे वडील माझ्या आईला म्हणायचे,हिला सांभाळा..वेळीच लक्ष द्या...नाहीतर ही वेडी होईल''.

मग एक दिवस मला बोलावून म्हणाले, ''असं का करतेयस तू बेटा? मी म्हटलं,मला असं वाटतं की जेव्हा मी हसेन तेव्हा माझ्यासोबत जगानं हसावं आणि जेव्हा मी रडेन तेव्हा माझ्यासोबत जगानं रडावं''.

तेव्हा अरबाज म्हणताना दिसतो,''ही तर अभिनेत्री बनण्याची लक्षणं होती''.

अरबाजनं संवाद पुढे सुरु ठेवत वहीदा रहमान यांना विचारलं की,'तुम्हाला तुमचं नाव बदलण्यासाठी इंडस्ट्रीत सांगितलं होतं का?'

तेव्हा उत्तर देताना वहीदा रहमान म्हणाल्या,''असं सांगितलं गेलं तर मी म्हणायचे,माफ करा..हे माझं स्वतःचं नाव आहे. माझ्या आई-वडीलांनी मला दिलेलं. मी माझं नाव का बदलू?''

''दिवस-रात्र मेहनत करण्यासाठी मी तयार आहे..पण ज्या गोष्टी मी सहज करू शकत नाही त्या मी करणार नाही..कारण त्या मी करूच शकणार नाही हे मला माहित आहे''.

वहीदा रहमान यांनी नुकताच त्यांचा ८५ वा वाढदिवस साजरा केला आहे.