Prajakta Mali: 'नाहीतर तुम्ही खरंच डिप्रेशनमध्ये जाल..', प्राजक्ता माळी स्पष्टच बोलली

सध्या सोशल मीडियावर प्राजक्ताचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय ज्यात तिनं डिप्रेशनचं मुख्य कारण सांगत त्याच्यावर सोल्युशनही दिलं आहे.
Prajakta Mali
Prajakta MaliInstagram

Prajakta Mali: प्राजक्ता माळी हे नाव सध्या महाराष्ट्राच्या गल्ली-गल्लीत चर्चेत आहे. प्राजक्तानं सोशल मीडियावर काही पोस्ट केली आणि ती चर्चेत आली नाही असं होणं कठीणच. प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमीच राजकीय,सामाजिक विषयांवर पोस्ट करताना दिसते. तिची प्रशंसा तुफान होते पण तितकंच तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. (Prajakta Mali On depression video viral)

Prajakta Mali
Tunisha Sharma Death: शीझान खानला जामीन नाहीच, 'अली' नावानं आणला तुनिषा शर्माच्या केसमध्ये नवा ट्वीस्ट

मालिकांमधून प्रकाशझोतात आलेल्या प्राजक्तानं आता मोठ्या पडद्यावरच नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. रानबाजार या वेबसिरीजमधील तिच्या भूमिकेनं अनेकांच्या भूवया उंचावल्या असल्या तरी प्राजक्तानं केलेल्या कामाची दाद देणारा चाहता वर्गही मोठा होता. आज सोशल मीडियावर तिचे सर्वाधिक फॅन्स आहेत. सध्या तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे,ज्यात प्राजक्ताने डिप्रेशनवर स्पष्ट भाषेत आपले विचार मांडले आहेत.

Prajakta Mali म्हणाली, ''आपण आनंदी आहोत याच्यावर आपला विश्वास बसत नाही...पण दुसरे आनंदी आहेत यावर मात्र आपला पटकन विश्वास बसतो. आणि त्यांना पाहून आपल्याला आपण दुःखी आहोत असे वाटते. तुम्ही तुमच्या मोबाईलवर मेसेजवर किती वेळ बोललात,व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर किती तास घालवला..हे चेक केल्यावर तुम्हालाच कळेल की दुसरे त्यांच्या आयुष्यात काय करतात हे पाहण्यात तुम्ही तुमच्या आयुष्यातला अमूल्य वेळ वाया घालवत आहात''.

Prajakta Mali
Bigg Boss 16: Top 3 मध्ये असतील 'हे' स्पर्धक, बोलता-बोलता सिमी ग्रेवालनी सांगून टाकली नावं...

आणि हेच तुमच्या डिप्रेशनचं मुख्य कारण ठरू शकतं..तु्म्ही निमंत्रण देताय डिप्रेशनला..तुम्ही सोशल मीडियावर किती वेळ घालवता हे ठरवून घ्याय नाहीतर तुम्ही डीप्रेशनमध्ये जाल...प्राजक्ताचा हा व्हिडीओ बातमीत जोडलेला आहे. प्राजक्तानं दिलेल्या या मोलाच्या सल्ल्याविषयी तिच्या चाहत्यांनी तिचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com