
प्रकाश राज यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन तो व्हिडीओ शेअर केला आहे.
भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी कोरोना व्हायरसबद्दल जणजागृतीसाठी एक व्हर्चूअयल रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीतील एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या रॅलीत बोलत असताना अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचे कौतुक केले. पण बोलताना मोदींनी 51 कोटी लोकांच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपये पाठवले असं म्हणाले. या विधानावरुन अभिनेता प्रकाश राज यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.
गंगूबाईमध्ये अजय देवगण दिसणार गँगस्टर करीमलालाच्या भूमिकेत
प्रकाश राज यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन तो व्हिडीओ शेअर करत लिहीले की, “ किती लज्जास्पद गोष्ट आहे, या लोकांना धड खोटं देखील बोलता येत नाही” प्रकाश राज यांचं हे ट्विट सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनला आहे. अमित शाहा य़ांनी या रॅलीमध्ये अमित शाहा य़ांनी स्पष्ट केले होते की, या व्हर्चूअल रॅलीचा उद्देश बिहारच्या निवडणूकांसाठी प्रचार करण्याचा नसून, कोरोना व्हायरस माहामारीच्या काळात लोकांचे मनोबळ वाढवण्यासाठी ही रॅली घेण्यात येत आहे.
What a SHAME ...Even Lies can’t LIE ...#JustAsking pic.twitter.com/7riq0yos7j
— Prakash Raj (@prakashraaj) June 10, 2020
अभिनेत्री तापसीने कामगारांचा भावनिक व्हिडीओ केला शेअर, मात्र लोक करतायेत ट्रोल!
प्रकाश राज हे बॉलिवुडमध्ये त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात, ते सोशल मिडीयावर देखील खूपच सक्रिय असतात. त्यासोबतच ते सामजिक तसेच राजकिय विषयांवर स्वतःची मते बेधडकपणे मांडत असतात. लॉकडाऊनच्या काळात ते गरजू लोकांना घरी पोहचवण्यासाठी काम करताना दिसत आहेत.
entertainment