
तापसीने तीच्या ट्विटर अकांउटवरुन स्वतःच्याच आवजात असलेला व्हिडीओ पोस्ट केला आहे.
बॉलिवुड अभिनेत्री तापसी पन्नू तीचा दमदार अभिनय आणि सामजिक आशय असलेल्या चित्रपटांच्या निवडीसाठी ओळखली जाते. तापसी सोशल मिडीयावर सामाजिक मुद्द्यावर स्वतःची मते मोकळेपणाने व्यक्त करत असते. कोरोना व्हायरसमुळे प्रवासी कामगारांना सहन कराव्या लागलेल्या अडचणी दाखवणारा भावनिक व्हिडीओ तापसीने शेअर केला आहे.
रणदीप हुड्डाने ‘लॉकडाऊन’मध्ये विक्रमी नफा कमवणाऱ्या पारले-जी कंपनीला केली खास विनंती
तापसीने तीच्या ट्विटर अकांउटवरुन स्वतःच्या आवजात असलेला व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये लॉकडाऊनच्या काळाता प्रवासी कामगारांनी ज्या अडचणींचा सामना करावा लागला त्या सर्व गोष्टींचा अनिमेशनच्या स्परुपात फोटो दाखवत आढावा घेण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये बातमीच्या स्वरुपात व्हायरल झालेले भावनिकफोटो या व्हिडीओत दाखवले आहेत. या फोटोंना पाहून लोंकाच्या डोळ्यात पाणी आले त्या सर्व फोटोंचा कलात्मक वापर या व्हिडीओत कोला आहे, या व्हिडीओला व्हायस ओव्हर खुद्द तापसीने दिला आहे.
"अभिनेत्री एरिका फर्नांडिस म्हणते.. मी नाही जाणार शूटिंगला !"
व्हिडीओ शेअर करत असताना तापसीने मार्मिक कॅपशन देखील दिले आहे, “ हे फोटो आपल्या डोक्यातून कधीच जाणार नाहीत, यांचे आवाज आपल्या डोक्यात परत-परत ऐकू येतील. भारतासाठी ही माहामारी फक्त व्हायरल इनफेक्शनपेक्षा खूप जास्त काही होतं. कदाचीत आपण सगळ्यांनी तोडलेल्या त्या हजारो ऱ्हदयांसाठी.” या व्हिडीओत ओळीने फोटो दिसत राहातात आणि तापसीच्या आवाजात काही ओळी ऐकायला येतात.
A series of pictures that probably will never leave our mind.The lines that will echo in our head for a long time.This pandemic was worse than just a viral infection for India.हमारे दिल से , आपके दिल तक, उन हज़ारों दिलों के लिए जो शायद हम सब ने तोड़े हैं । #Pravaasi #CovidIndia pic.twitter.com/dB5yyYvEYB
— taapsee pannu (@taapsee) June 10, 2020
तापसी या 1 मिनीट आणि 42 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये लोकांनी सहन कराव्या लागत असलेल्या अडचणी सांगताना ऐकू येते. लोक अन्न-पाण्याविना पायी, सायकलवर चालत घराकडे निघाले, पण त्यात कितीतरी जण उनाचा सामना करत तर काही भूकेने मरण पावले. आपल्या देशात प्रतिमांना महत्व आहे पण लोकांचा जीव स्वस्त झाला आहे. तापसी या व्हिडीओच्या माध्यमातून सांगत आहे.या व्हिडीओला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, सोबतच तुम्ही कामगारांसाठी काय मदत केली ते सांगा म्हणत नेटकरी तापसीला ट्रोल करत आहेत. तुम्ही झोपा काढा कामगारांसाठी सोनू सूद पुरेसा आहे. अशा शब्दात ट्रोलर्स कडून तापसीवर हल्ला चढवण्यात येत आहे. entertainment