Prarthana Behere:वयाच्या तिशीतही तुम्हाला मुलं नसतात तेव्हा.. प्रार्थनाची पोस्ट चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prarthana Behere shared post about motherhood

Prarthana Behere: वयाच्या तिशीतही तुम्हाला मुलं नसतात तेव्हा.. प्रार्थनाची पोस्ट चर्चेत

prarthana behere: ‘मितवा’ चित्रपटातून मराठी चित्रपसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने सिने सृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘माझी तुझी रेशीगाठ’ मालिकेतील नेहाच्या पात्राने पुन्हा तिला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचवंल आहे. मराठीच नव्हे तर हिंदी भाषेतही तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तिने ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘ती अँड ती’, ‘फुगे’, ‘लव्ह यू जिंदगी’ यांसारखे मराठी चित्रपट केले आहेत. ती सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय असते. आज तिची एक पोस्ट बराच चर्चेचा विषय ठरत आहे. आणि ती पोस्ट आहे मातृत्वाविषयी..

(Prarthana Behere shared post about motherhood )

हेही वाचा: Uunchai movie: अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी करतायत झुंबा, हे आहे कारण..

कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्यात सर्वांनाच खूप रस असतो. त्यामुळे त्यांचे लग्न सोहळे, त्यांची मुलं, गोड बातमी याकडे सर्वांचे लक्ष असते. विशेष म्हणजे अभिनेत्रींचे लग्न झाल्यानंतर त्यांना 'तू आई कधी होणार' असा प्रश्न विचारला जातो. आता याविषयी प्रार्थनाने एक पोस्टच्या माध्यमातून तिचे मत व्यक्त केले आहे.

या पोस्ट मध्ये तिने एक फोटो शेयर केला आहे, जी रस्त्यावर लिहिण्यात आलेली एक पाटी आहे. पण त्यावरचे शब्द प्रार्थनेला भावले आहेत. त्या पाटीवर लिहिलंय कि, ''जेव्हा वयाच्या तिशीत तुम्हाला मुलं नसतात तेव्हा खरं तर तुमची स्थिती वयाच्या विशीत असल्यासारखीच असते, फक्त त्यावेळी तुमच्याकडे पैसे असतात”. असे त्यावर लिहिण्यात आले आहे. हा फोटो पोस्ट करत तिने 'हे अगदी खरंय' असं म्हटलं आहे.

Prarthana Behere shared post about motherhood

Prarthana Behere shared post about motherhood

अलीकडेच प्रार्थनाने 'बस बाई बस' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी सुद्धा तिला 'तू आई कधी होणार' असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने थोडं रागात सुबोध भावेकडे पाहिलं आणि त्यावर तिने चिडक्या स्वरात उत्तर दिले. तुम्ही सर्व चांगलेच प्रश्न विचारताय ना? मग चांगलाच प्रश्न विचारा ना.. असे प्रार्थना त्यांना म्हणाली. त्यावर महिला वर्गाने हे चांगलं आहे, असे म्हटले. त्यावर प्रार्थना म्हणाली, 'माझ्या सासूबाईही हा शो बघत आहेत. मी काही वाईट काम करते का? पण मग हे सर्व झाल्यावर मला काम करता येणार नाही. नको ना… हा विषय नको. मला खूप बाळं आहेत. आमच्याकडे पाच पाळीव श्वान आहेत, बारा घोडे आहेत आणि मासे आहेत, दोन उंदीर आहेत, अशी खूप मुलं आहेत. त्याबरोबर मायरा माझी मुलगीच आहे.' असे उत्तर तिने दिले होते. कदाचित या प्रश्नाचे तिने आज या पोस्टच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.

टॅग्स :prarthana behere