
माझी तुझी रेशीमगाठ : प्रार्थना बेहरेचा मालिकेला रामराम..
'झी' मराठी वरील 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath ) ही मालिका सध्या प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेच्या माध्यमातून वेगळी प्रेमकथा हाताळण्यात आली. सध्या ही मालिका चांगलीच चर्चेत असून यश आणि नेहा आणि परी ही तीनही पात्रे चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. प्रार्थना बेहरे यामध्ये नेहा हे पात्र साकारत आहे. प्रार्थनाने याआधी बऱ्याच मालिका आणि चित्रपट केल्याने तीचा चाहता वर्ग मोठा आहे. सध्या प्रार्थनाने मालिकेला रामराम ठोकल्याची बातमी पसरली असून यामुळे चाहते नाराज झाले आहेत.
सध्या मालिकेत ‘नेहा’ म्हणजे प्रार्थना कामानिमित्त लंडनला जाताना दाखवली आहे. यामुळे पुढचे काही दिवस आता प्रार्थना मालिकेत दिसणार नाही. मालिकेतच नव्हे तर अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (prarthana behere) खऱ्या आयुष्यातही लंडनवारी करत आहे. प्रार्थना पतीसमवेत सध्या लंडनमध्ये आहे. नुकताच तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत याची माहिती दिली आहे.
प्रर्थानाने तिच्या व्हिडीओत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिला टॅग करत, ‘आम्ही लवकरच येतोय’ असं म्हटल आहे. सोनाली कुलकर्णी सध्या लंडनमध्ये असून, पुन्हा एकदा बोहल्यावर चढण्याची तयारी करत आहे. लॉकडाऊन दरम्यान लग्नगाठ बांधलेल्या सोनालीच्या लग्नात कुणीही उपस्थित राहू शकलं नव्हतं. त्यामुळेच लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचं निमित्त साधत ती पुन्हा एकदा सर्वांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात लग्न करणार आहे. या लग्नसोहळ्यासाठीच प्रार्थना लंडनला जात असल्याचा अंदाज चाहते बांधत आहेत.