'Prasad Oak ३३ कोटी देव नाहीत तुम्ही जरा...', अभिनेत्याला नेटकऱ्यानं फटकारलं Prasad Oak Trolled | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prasad Oak

'Prasad Oak ३३ कोटी देव नाहीत तुम्ही जरा...', अभिनेत्याला नेटकऱ्यानं फटकारलं

Prasad Oak: अभिनेता,दिग्दर्शक प्रसाद ओक सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेला पहायला मिळतो. तो अनेकदा काही फनी व्हिडीओ आणि रील्सही सोशल मीडियावर पोस्ट करतो आणि चर्चेत येतो. यासाठी त्याची पत्नी देखील त्याला साथ देताना दिसते आणि त्यांच्या व्हिडीओजना भरपूर पसंती देखील मिळते.

मात्र नुकतेच प्रसादनं शेअर केलेल्या एका व्हिडीओवर नेटकरी खवळलेयत...कारण प्रश्न आहे ३३ कोटी देवांचा...अन् अर्थात लोकांच्या भावनांचा...चला नेमकं काय म्हणाला आहे प्रसाद त्या व्हिडीओत ते पाहूया..(Prasad Oak funny video trolled)

प्रसाद ओकनं एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात तो म्हणताना दिसतोय,'' हे ३३ कोटी देवी-देवतांनो मला तुमच्याकडून काही नको...फक्त मला प्रत्येकानं १-१ रुपया द्या..बाकी काही नको..''..हा व्हिडीओ पोस्ट करत प्रसादनं त्याला कॅप्शन दिलं होतं की,''एवढंच मागतोय फक्त...
काही चुकतंय का ??''

आता याचा अर्थ काय होतो तर ३३ कोटी देव १-१ रुपया देणार म्हणजे प्रसादकडे ३३ कोटी जमा होणार. आणि त्याची डिमांडही तिच आहे खरंतर..आता हे प्रसादनं मजेदार अंदाजात एक टाईंमपास म्हणून शेअर केलं असावं..

पण यावरनं नेटकरी मात्र भलतेच खवळलेयत. एकानं तर थेट,'अहो प्रसाद ओक ३३ कोटी देव नसतात..पहिला तुमचा गैरसमज दूर करा..'.

तो नेटकरी प्रसादला फटाकारत म्हणाला आहे,''33 कोटी देव म्हणजे 33 करोड नव्हे.......
33 कोटी देव म्हणजे 8-Vasu, 11-Rudra, and 12-Aaditya, 1-Indra and 1-Prajaapati
प्रत्येकांनी १ रूपया दिला तर तुमच्या कडे ३३ रूपये होतील ३३ कोटी नाही oak saheb
३३ कोटी देव म्हणजे ३३ करोड देव हा गैरसमज दूर करावा....
धन्यवाद''.