Prasad Oak: भांबावलेल्या अवस्थेत मी मूर्तीकडे पाहिलं आणि... पंढरपूरहून प्रसादला भेटायला आलेल्या फॅन्सचा अनोखा किस्सा वाचा

प्रसादने सोशल मिडियावर पंढरपूरहून त्याला भेटायला आलेल्या फॅन्सचा किस्सा शेअर केलाय
prasad oak share special post fans meet him from pandharpur and give him viththal murti
prasad oak share special post fans meet him from pandharpur and give him viththal murti SAKAL

प्रसाद ओक हा मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतला अभिनेता. प्रसाद ओकला आपण आजवर अनेक मालिका, सिनेमे आणि नाटकांमधून अभिनय करताना पाहिलंय.

प्रसादने काही वर्षांपूर्वी धर्मवीर सिनेमातून आनंद दिघेंची भूमिका साकारली. प्रसादचं या सिनेमामुळे प्रचंड फॅन फॉलोईंग वाढलंय. याचाच अनुभव नुकताच आला. प्रसादला थेट पंढरपूरहून विठ्ठल मूर्ती भेट द्यायला काही फॅन्स आले. हा भारावून जाणारा अनुभव प्रसादने शेअर केलाय. तुम्हीही वाचा.

(prasad oak share special post fans meet him from pandharpur)

prasad oak share special post fans meet him from pandharpur and give him viththal murti
Nagraj Manjule : 'नाळ'चा दुसरा भाग येतोय; नागराज मंजुळेंकडून चाहत्यांना पर्वणी

प्रसादने सोशल मिडियावर फॅन्सने दिलेल्या विठ्ठल मूर्तीचा आणि केलेल्या सत्काराचा फोटो सोशलम मिडियावर शेअर करुन लिहीलंय की, आज अचानक पॅकअप नंतर कपडेपट करणारा आमचा संतोष जगताप vanity van मधे आला आणि म्हणाला… “ दादा… माझे काही मित्र पंढरपुरातून इथे सांगलीत स्पेशल गाडी करुन फक्त तुला भेटायला आलेत… त्यांना ५ मिनिटं देशील का?” मी म्हटलं बोलाव… त्यानंतर नवनाथ गायकवाड आणि त्यांचे २/३ मित्र अशी काही मंडळी आली… काही कळायच्या आत एकानी मला फेटा बांधला… दुसऱ्यानी गळ्यात हार घातला… आणि तिसऱ्यानी म्हणजे नवनाथ नी… ही सुंदर मूर्ती माझ्या हातात ठेवली… आणि सगळे जाऊ लागले… मी म्हणालो “ एवढ्याच साठी आला होतात..???” त्यावर ते म्हणाले “ हो दादा… वाटलं ही मूर्ती तुमच्या हातात द्यावी.. बास..”

प्रसाद पुढे लिहीते, "आणि सगळे क्षणार्धात… मला आभार मानण्याची संधीही न देता निघून गेले… मला खरंच कळत नाही कधी कधी की या अशा निर्लेप, निखळ, निरपेक्ष प्रेमाचं उतराई कसं व्हायचं??? या जिव्हाळ्याचं, या आपुलकीचं काय करायचं…??? सध्या चालू असलेलं काम म्हणजे खरोखरच एक “अवघड वाट” आहे… पुढच्या कामांचंही मनात दडपण आहे…
अशा वेळी कुठं चुकलो तर??? म्हणून मला “संगत” द्यायला. आला असावा की काय तो…???"

प्रसाद शेवटी लिहीतो, "या अशाच भांबावलेल्या आणि भारावलेल्या अवस्थेत मी त्या मूर्ती कडे पाहिलं आणि त्या क्षणी “धर्मवीर” मधले आमच्या
संगीता ताई बर्व्यांनी लिहिलेले शब्द आठवले… संगतीनं ओलांडला अवघड घाट
चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट.. तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट
सुख दुःख एका मेका वाटलं वाटलं.. भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल…!!!"

प्रसाद लवकरच धर्मवीर 2 सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय जिलबी आणि वडापाव हे प्रसादचे काही आगामी मराठी सिनेमे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com