तरुणांचे हार्टबीट वाढवणारा 'टकाटक २' या दिवशी होणार प्रदर्शित..

मराठीतील बोल्ड सिनेमा 'टकाटक २' लवकरच प्रदर्शित होत आहे.
Prathamesh Parab's Takatak 2 movie will release on 19 August
Prathamesh Parab's Takatak 2 movie will release on 19 August sakal

takatak 2 : टकाटक या चित्रपटाने मराठी चित्रपटांच्या यादीत एक वेगळा विषय मांडला. बोल्ड स्वरूपातील हा विषय प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. अभिनेता प्रथमेश परब (prathmesh parab) याची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट बोल्डनेस सोबतच तरुणाईला एक महत्वाचा संदेश देणारा ठरला. तरुणाई ऐन वयात कोणत्या चुका करते यावर भाष्य करणारा हा चित्रपट होता.पण विनोदी शैलीने तो मांडण्यात आला. या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक मिलिंद कवडे याचित्रपटाचा दुसरा भाग लवकरच घेऊन येणार आहेत, त्यासंदर्भात एक मोठी घोषणा नुकतीच करण्यात आली. (Prathamesh Parab's Takatak 2 movie release on 19 August)

'टकाटक २' हा चित्रपट १९ ऑगस्ट २०२२ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये प्रथमेश परब मुख्य भूमिका साकारणार आहे तर अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर, स्वप्नील राजेशिर्के, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे काळे, स्मिता डोंगरे या कलाकारांच्याही चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत.

'टकाटक २'ची निर्मिती रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओ, पर्पल बुल एंटरटेनमेंटच्या सहयोगाने केली असून ओमप्रकाश भट्ट, रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओ, आदित्य जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर मिलिंद कवडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे.

'टकाटक'प्रमाणेच 'टकाटक २'देखील मनोरंजनातून काहीतरी संदेश देणारा असेल असा अंदाज प्रेक्षकांनी बांधला आहे. या चित्रपटाचं बरचसं चित्रीकरण गोव्यात झालं असल्यानं गोव्यातील धमाल-मस्ती यात नक्कीच असेल. 'टकाटक २' हा चित्रपट प्रेक्षकांना 'टकाटक'च्या एक पाऊल पुढे घेऊन जाणारा असेल असा विश्वास मिलिंद कवडे यांनी व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com