
कलाजगतातील अनेक कलावंत आपल्या हटके अशा स्टाईलमुळे प्रसिध्द आहेत. ते नेहमी आकर्षक अशी फॅशन करुन लक्ष वेधून घेत असतात. सध्या प्रतिक बब्बर त्याच्या आगळ्या वेगळ्या लुकमुळे व्हायरल झाला आहे.
मुंबई - लक्ष वेधून घेण्यासाठी कधी कोण काय करेल याचा भरवसा नाही. जगावेगळी वेशभुषा, रंगभूषा हे नाही केलं तर काही हटके केशरचना करणारी अवलिया चर्चेत येतात. जसा प्रतिक बब्बर हा आता भलताच फॉर्मला आला आहे. त्यानं जो मेक अप केला आहे तोच इतका वेगळा आहे की तो पाहिल्यावर प्रश्न पडतो, प्रख्यात अभिनेत्री स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतिक असे वेगळे प्रयोग का करतो आहे.
कलाजगतातील अनेक कलावंत आपल्या हटके अशा स्टाईलमुळे प्रसिध्द आहेत. ते नेहमी आकर्षक अशी फॅशन करुन लक्ष वेधून घेत असतात. सध्या प्रतिक बब्बर त्याच्या आगळ्या वेगळ्या लुकमुळे व्हायरल झाला आहे. त्याने केलेला लूक खूपच चर्चेचा विषय ठरला आहे. त्याने जो एक फोटो शेयर केला त्यात त्याचे केस अर्धवट रंगवलेले आहेत. तर बोटांना नेलपेंट लावले आहे. यामुळे तो अनेकांच्या टीकेचाही विषय ठरला आहे. कित्येकांनी त्याला त्यावरुन ट्रोल केले आहे. प्रतिकने असा लूक का केला असेल असा प्रश्न विचारुन नेटक-यांनी भंडावून सोडले आहे.
प्रतिकने शेअर केलेल्या फोटोत त्याचे अर्धे केस आणि एक भुवईला लाल कलर लावला आहे. तर दुसऱ्या फोटोत तो नेलपेंट लावताना दिसत आहे. असा फोटो त्याने शेयर केला आहे. त्याला त्याने वेगळ्या प्रकारचे कॅप्शन दिले आहे. ते माझ्यावर हसतात कारण मी वेगळा आहे. पण मी त्यांच्यावर हसतो कारण ते सगळे एकसारखेच आहेत. जोकर..”असं कॅप्शन प्रतिकने या फोटोला दिलं आहे. सध्या प्रतिककडे कुठलाही नवा सिनेमा अथवा वेबसीरीज नाही. त्यामुळे कदाचित लक्ष वेधून घेण्यासाठी त्यानं अशाप्रकारचा मेक अप केल्याचे बोलले जात आहे. टायगर श्रॉफच्या एका चित्रपटात तो झळकला होता.
शाहरुखच्या गौरीनं केलं अलियाच्या घराचं इंटेरियर; किंमत फक्त 32 कोटी
एका आगामी चित्रपटात ट्रान्सची भूमिका करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आता त्यावर प्रतिकने कुठलाही खुलासा केलेला नाही. त्याने सोशल मीडियावरुन प्रसिध्द केलेले फोटो हे त्याचाच एक भाग असल्याचे म्हटले जात आहे. कदाचित त्यानं त्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे सारं केलं जात आहे की तो निव्वळ लक्ष वेधून घेण्याकरिताचा प्रकार आहे याविषयी तो स्वताच सांगेल.