Preity Zinta: 'प्रत्येक गोष्टीसाठी सेलिब्रिटींना दोष देणे थांबवा', दोन घटना अन् ट्रोलिंग! प्रिती झिंटा संतापली...

गेल्या काही दिवसांपासून प्रिती झिंटा ही खुपच वाईटरित्या ट्रोल होत होती. तिचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. ज्यात एक अपंग व्यक्ती तिच्या गाडीचा पाठलाग करत होता आणि प्रिती त्याच्याकडे दुर्लक्ष करत तेथून निघाली. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरलं आणि तिच्यावर टिका केली.
Preity Zinta
Preity Zinta Esakal

अभिनेत्री प्रीती झिंटाने एकेकाळी अनेक हिट चित्रपट दिले होते. आज जरी ती इंडस्ट्रीपासून दूर असली, पण तिच्या फॅन फॉलोइंगमध्ये कोणतीही कमी आलेली नाही. ती सोशल मीडियावर सक्रिय राहते आणि फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांशी कनेक्ट राहते.

मात्र गेल्या काही दिवसांपासून प्रिती झिंटा ही खुपच वाईट रित्या ट्रोल होत होती. तिचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. ज्यात एक अपंग व्यक्ती तिच्या गाडीचा पाठलाग करत होता आणि प्रिती त्याच्याकडे दुर्लक्ष करत तेथून निघाली. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरलं आणि तिच्यावर टिका केली.

Preity Zinta
Kangana Ranaut: अरेच्चा कंगना कौतूकही करते! 'या'अभिनेत्रीसाठी पोस्ट शेअर करत म्हणाली, 'चुपचाप चित्रपट..'

आता मात्र प्रितीने तिच्या सोशल मिडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर करत या सर्व प्रकरणावर सविस्तर भाष्य केलं आहे. तिने या घटनेचा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, या आठवड्यातील दोन घटनांनी मला हादरवून सोडलं आहे. 'एक माझी मुलगी जियाबद्दल...

जिथं एका महिलेने तिचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला. जेव्हा आम्ही तिला नम्रपणे तिला असं करु नकोस असं सांगितल तेव्हा ती तिथून गेली आणि नंतर अचानक माझ्या मुलीला मिठीत घेवुन आणि तिच्या तोंडाजवळ ओले चुंबन घेतले आणि काय गोंडस बाळ आहे असं म्हणत पळून गेली.

ही महिला एका उच्चभ्रू इमारतीत राहते आणि हे तेव्हा घडलं जेव्हा माझी मुलं बागेत खेळत होती जर मी सेलिब्रिटी नसते तर कदाचित मी वाईट प्रतिक्रिया दिली असती पण मला त्यावेळी काही सीन करायचा नव्हता म्हणून मी शांत राहिले.'

Preity Zinta
Shahid Kapoor: कबीरसिंग आता प्रितीसोबत नव्हे तर क्रितीसोबत..बुलेटवर रंगला रोमान्स! पोस्टर व्हायरल

'तुम्ही इथे दुसरी घटना पाहू शकता. मला माझी फ्लाईट पकडायची होतीआणि हा अपंग माणूस मला थांबवण्याचा प्रयत्न करत राहिला. गेल्या अनेक वर्षांपासून त्याने मला पैशांसाठी त्रास दिला आहे आणि जेव्हा शक्य होईल तेव्हा मी त्याला ते दिले आहे.

यावेळी त्याने माझ्याकडे पैसे मागितले तेव्हा मी म्हणाले माफ करा आज माझ्याकडे पैसे नाहीत, फक्त एक क्रेडिट कार्ड आहे. माझ्यासोबत असलेल्या महिलेने त्याला तिच्या पर्समधून काही पैसे दिले. पण ते त्याच्यासाठी पुरेसे नव्हते त्याने ते पुन्हा तिच्याकडे फेकले आणि आक्रमक झाला. जसं की तुम्ही पाहू शकतात त्याने काही वेळ आमचा पाठलागही केला.'

'त्यांनी याचं चित्रीकरण केले आणि हसले. कोणालाही दुखापत होऊ शकते म्हणून कारच्या मागे जाऊ नका किंवा आम्हाला त्रास देऊ नका असं त्या व्यक्तीला सांगितले नाही. अपघात झाला असता तर मला दोषी ठरवले गेले असते. माझ्या सेलिब्रिटी असण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असते. बॉलीवूडला दोष देत बरिच नकारात्मकता पसरवली गेली आहे.

मला वाटतं की मी सर्वात आधी एक माणूस, नंतर आई आणि नंतर सेलिब्रिटी आहे, हे लोकांना समजण्याची वेळ आली आहे. मला माझ्या यशाबद्दल सतत माफी मागण्याची गरज नाही कारण जिथे मी आहे तिथे पोहोचण्यासाठी मी खूप मेहनत केली आहे.'

Preity Zinta
Raveena Tandon: 'हिने काय केलयं पद्मश्री द्यायला', असं बोलणाऱ्यांना रवीना टंडनने चांगलच झापलं...

'मलाही या देशात इतरांसारखचं हवं तसं जगण्याचा समान अधिकार आहे. म्हणून कृपया निर्णय घेण्यापूर्वी विचार करा आणि प्रत्येक गोष्टीसाठी सेलिब्रिटींना दोष देणे थांबवा. कुठल्याही गोष्टीला दोन बाजू असतात.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझी मुलं पॅकेज डीलचा भाग नाहीत आणि ते या सर्वाना बळी पडू देवू नये म्हणून कृपया माझ्या मुलांना एकटं सोडा आणि त्यांच्याकडे फोटोसाठी येऊ नका किंवा त्यांना स्पर्श करू नका. ते लहान आहेत आणि त्यांना छोट्या बाळांप्रमाणेच वागवले पाहिजे, सेलिब्रिटी म्हणुन नाही.

यासोबतच तिने फोटोग्राफर्स यांना देखील समजावले आहे. ती पुढे लिहिते,

'मला आशा आहे की जे छायाचित्रकार आम्हाला फोटो, व्हिडीओ आणि साउंड बाइट्ससाठी विचारतात त्यांच्याकडे द्या, माणुसकी आणि परिपक्वता आणि मदत करण्याची क्षमता असेल की भविष्यात चित्रीकरण करण्याऐवजी आणि हसण्याऐवजी कृती करतील कारण प्रत्येकवेळी ही हसण्याची गोष्ट नसते.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com