ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा पत्नीसह रुग्णालयात दाखल|Prem Chopra latest News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा पत्नीसह रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा पत्नीसह रुग्णालयात दाखल

बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय खलनायकांपैकी एक असलेले प्रेम चोप्रा (Prem Chopra) आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज राज कपूर (Raj Kapoor) यांची बहीण उमा कपूर (Uma Kapoor) यांच्या लग्नाला सहा दशकांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांना रकिता (Rakita), पुनीता (Punita) आणि प्रेरणा चोप्रा (Prerna) या तीन मुली आहेत.

दोन वर्षात कोरोनानं घातलेल्या थैमानामध्ये बॉलीवूडमधील अनेक दिग्गजांचे निधन झाले. आताही कोरोनानं कहर केला असून देशभरातमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.

दरम्यान, प्रेम चोप्रा आणि त्यांची पत्नी उमा चोप्रा यांना कोविडचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) नेण्यात आले. त्यांच्यावर डॉ जलील पारकर यांनी उपचार केले. दोघांनाही मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल (monoclonal antibody cocktail) दिले आहे आणि त्यांच्यात सुधारणा देखील होत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या वयातही त्यांचे शरीर चांगली साथ देत असल्याने, एक-दोन दिवसात डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Janhvi Kapoor : निळ्याशार पाण्यात जान्हवीचा Hot अंदाज

जॉन अब्राहम (John Abraham) आणि त्याची पत्नी प्रिया रुंचाल (Priya Runchal) यांचीही कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) आणि अमृता अरोरा (Amruta Arora) यांच्यासह आणखी सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी व्हायरल झाली होती.

काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि त्याच्या कुटूंबाला कोरोना झाला होता. त्यानंतर निर्माती, दिग्दर्शक एकता कपूरलाही (Ekta Kapoor) कोरोना झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नोरा फतेही (Nora Fatehi), मृणाल ठाकुर (Mrunal Thakur) यांनाही कोरोना झाल्याचे दिसून आले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top