Umesh-Priya : 'तो माझ्यासोबत यापेक्षा मोठा आनंद कोणता'? प्रिया-उमेशची 'जर तर ची गोष्ट'

मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी म्हणून प्रिया बापट आणि उमेश कामतचे नाव घेतले जाते.
Umesh-Priya
Umesh-Priyaesakal

Priya Bapat Umesh Kamat New Drama Jar Tar Chi Gostha : मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी म्हणून प्रिया बापट आणि उमेश कामतचे नाव घेतले जाते. गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही कलाकारांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. काही वर्षांपूर्वी त्यांची आणखी काय हवं नावाची सीरिज ओटीटीवर आली होती. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

सोशल मीडियावर उमेश आणि प्रियाचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यांना इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. आता दोन्ही सेलिब्रेटींनी त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. ती म्हणजे त्या दोघांची जर-तरची गोष्ट....दोघांच्याही करिअरचा आलेख वेगाने वर जात असतानाच त्यांच्या चाहत्यांना या जोडीला एकत्र पाहण्याची खूप इच्छा होती.

मात्र आता ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण एका दशकानंतर हे क्युट कपल पुन्हा एकदा रंगमंचावर एकत्र झळकणार आहे. नाटकाच्या माध्यमातून प्रिया आणि उमेशची हिट जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

प्रिया बापट आणि उमेश कामत हे मराठी इंडस्ट्रीतील 'क्युट कपल' म्हणून ओळखले जातात. दोघांनीही आपल्या दर्जेदार अभिनयाने यशाचे शिखर गाठले आहे. हिंदीत आपली ओळख निर्माण करत असतानाच प्रियाने नाटकाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रातही प्रवेश केला. तर उमेशही विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. प्रिया बापट सादर करत असलेल्या, सोनल प्रॉडक्शन निर्मित या नाटकाचे नाव 'जर तर ची गोष्ट' असे आहे.

या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर, रणजित पाटील यांनी केले असून इरावती कर्णिक यांनी लेखन केले आहे. तर नंदू कदम ‘जर तर ची गोष्ट’चे निर्माते आहेत. या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत, आशुतोष गोखले आणि पल्लवी अजय प्रमुख भूमिकेत दिसतील. रंगमंचावर एकत्र काम करण्याबाबत प्रिया बापट म्हणते, ''हे माझं दुसरं व्यावसायिक नाटक आहे. आपलंच प्रॉडक्शन असलेल्या नाटकात अभिनय करायला मिळणं आणि तेही आपल्या आवडत्या सहकलाकारासोबत ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.

Umesh-Priya
'Sara Ali Khan'च्या मंदिरात जाण्याने पुन्हा रंगला वाद!

प्रिया पुढे म्हणाली, माझा हट्ट आणि इच्छा होती की माझं पुढील नाटकही उमेशसोबतच असावे. यासाठी आम्ही फार वाट पाहिली. अखेर ही इच्छा पूर्ण झाली आहे. अतिशय प्रेमाची आणि हक्काची माणसं या नाटकाशी जोडली गेली आहेत. आता लवकरात लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची उत्सुकता आहे.'' तर उमेश प्रियासोबत पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल म्हणतो, ''नाटक हे माझं पहिलं प्रेम आणि माझ्या खऱ्या आयुष्यातील माझं प्रेम असं एकत्र मी माझ्या नवीन नाटकात जगणार आहे.

Umesh-Priya
Akshay Kumar : अक्षय धुतल्या तांदळाचा नाही, बॉलीवूडमधील एका अभिनेत्रीला त्यानं...

'नवा गडी नवं राज्य' या नाटकानंतर आम्ही एकत्र एक चित्रपट केला, वेबसीरिज केली. परंतु त्यानंतर असं वाटत होतं की एकत्र नाटक कधी करणार? आणि आता हा योग जुळून आला आहे. त्यामुळे प्रचंड उत्सुकता आहे. मुख्य म्हणजे सोनल प्रॅाडक्शन सोबत माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.''

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com