Priya Marathe: बहुमान! प्रिया मराठे गाजवणार मिरा - भाईंदर पालिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Priya Marathe: बहुमान! प्रिया मराठे गाजवणार मिरा - भाईंदर पालिका

Priya Marathe: बहुमान! प्रिया मराठे गाजवणार मिरा - भाईंदर पालिका

अभिनेत्री प्रिया मराठेला आजवर आपण अनेक हिंदी-मराठी मालिकांमधून भेटत पाहिलंय. तिने साकारलेल्या खलनायकी व्यक्तिररेखांची छाप आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. सध्या प्रिया 'तुझेत मी गीत गात आहे' या मालिकेत मोनिका ही व्यक्तिरेखा साकारत आहे. खऱ्या आयुष्यात प्रिया मराठेच्या शिरपेचात मोठा बहुमान प्राप्त झालाय.

हेही वाचा: Adipurush च्या वादाचा मेकर्सला मोठा फटका, इतक्या करोडनी वाढणार बजेट, नवीन रिलीज डेट समोर...

मिरा-भाईंदर महानगर पालिकेच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या 'स्वच्छ्ता सर्वेक्षण २०२३' उपक्रमासाठी प्रिया मराठे ब्रँड ॲम्बेसेडर झाली आहे. प्रिया मराठेने सोशल मीडियावर पोस्ट करून हि माहिती सर्वांसोबत शेयर केली आहे. मीरा भाईंदर पालिके अंतर्गत प्रिया मराठेचं जंगी स्वागत करण्यात आलं.

प्रिया मराठेने सोशल मीडियावर या उपक्रमाविषयी सविस्तर लिहिलं आहे. प्रिया लिहिते,"मिरा-भाईंदर महानगर पालिका.. 'मला स्वच्छ्ता सर्वेक्षण २०२३' ब्रँड ॲम्बेसेडर बनवल्या बद्दल खूप धन्यवाद.. समाजाप्रती असलेली जबाबदारी थोड्या फार प्रमाणात पूर्ण करता येईल.. आणि ह्याच अभियाना अंतर्गत आज पहिला केलेला कार्यक्रम म्हणजे आपले खरे heroes Ani heroines , जे सकाळी ६ पासून आपलं शहर सुंदर आणि स्वच्छ ठेवतात, त्या स्वच्छ्ता कर्मचाऱ्यांचा सत्कार.."

हेही वाचा: Bigg Boss 16: दोस्ती! अब्दू बिग बॉसच्या बाहेर..शिवला अश्रू अनावर

या मोठ्या सामाजिक उपक्रमात सहभाग घेत असल्याने सोशल मीडियावर प्रिया मराठेचं कौतुक होत आहे. अभिनेत्री म्हणून झगमगत्या मनोरंजन विश्वात वावरत असूनही प्रियाने सामाजिक भान जपलं आहे. प्रियाचा नवरा शंतनू मोघे हा सुदधा सुप्रसिद्ध अभिनेता आहे.

प्रियाने छोट्या पडद्यावर तिची स्वतःची विशेष ओळख निर्माण केली आहे, ‘या सुखांनो या’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘तू तिथे मी’ या मराठी मालिकांमधून प्रियाने प्रेक्षकांचे मन जिंकले. तसेच ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘साथ निभाना साथिया’ या हिंदी मालिकांमधून प्रियाने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सध्या प्रिया स्टार प्रवाह वर तुझेच मी गीत गात आहे मालिकेत साकारत असलेल्या मोनिकाची प्रेक्षकांमध्ये क्रेझ आहे.