
एका व्हायरल व्हिडीओमुळे प्रिया रातोरात प्रकाशझोतात झाली.
सोशल मीडियावरील एका व्हायरल व्हिडीओमुळे प्रिया प्रकाश वारियर ही तरुणी रातोरात लोकप्रिय झाली. प्रियाचा डोळा मारतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तेव्हापासून ती 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखली जाऊ लागली. आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या प्रियाचे सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक लिपसिंक व्हिडीओ पोस्ट केला असून सध्या सोशल मीडियावर त्याचीच चर्चा आहे.
प्रियाच्या या नवीन व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होतोय. अरिजीत सिंह आणि श्रेया घोषाल यांच्या 'मनवा लागे' या गाण्यावर तिने लिपसिंक व्हिडीओ शूट केला आहे. 'एक्स्प्रेशन क्वीन' प्रियाचे हावभाव पाहून तुम्हीसुद्धा तिच्या प्रेमात पडाल. याआधीही प्रियाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत..
हेही वाचा : "आम्ही दोघं.."; बाळासाहेब ठाकरेंच्या नातवासोबत जोडलं जातंय अभिनेत्रीचं नाव
हेही वाचा : PM मोदी की राहुल गांधी ? पोल घेऊन फसला रणवीर शौरी
'ओरु अदार लव्ह' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक छोटा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओतील तिच्या अदांवर अख्खं जग भाळलं होतं. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रिया तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आली होती. या चित्रपटात सहकलाकार अब्दुल रऊफसोबत तिच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. सध्या प्रिया तिच्या आगामी तेलुगू चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात तिच्यासोबत नितिन आणि रकुल प्रीत सिंह झळकणार आहेत. प्रियाचा हा पहिलाच तेलुगू चित्रपट आहे. येत्या २६ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.