esakal | प्रिया वारियरच्या ‘लडी लडी’चा धिंगाणा; संक्रांतीच्या दिवशी नवं गाणं
sakal

बोलून बातमी शोधा

priya varrier new song ladi ladi viral on social media

प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून म्युजिक व्हिडीओ प्रदर्शित होणार  असल्याची माहिती एका पोस्टद्वारे दिली होती.

प्रिया वारियरच्या ‘लडी लडी’चा धिंगाणा; संक्रांतीच्या दिवशी नवं गाणं

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - ओरु अदार लव्ह मधील एका दृश्यामुळे प्रसिध्दीच्या शिखरावर पोहोचलेली प्रिया वारियर आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या गाण्याचा नवा व्हिडिओ प्रसिध्द झाला आहे. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. डोळ्यांच्या कटाक्षानं सर्वांचे लक्ष वेधून घेणारी प्रिया सोशल मीडियावर चांगलीच प्रसिध्द आहे.

प्रियाचा जो नवीन म्यूजिक व्हिडीओ आला आहे ते गाणं तेलुगू  आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्याचे नाव ‘लडी लडी’ आहे. प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून म्युजिक व्हिडीओ प्रदर्शित होणार याची माहिती एका पोस्टद्वारे दिली होती. त्या पोस्टमध्ये या म्यूजिक व्हिडीओचे पोस्टर प्रियाने शेअर केला आहे.

या गाण्यात प्रिया सोबत रोहित नंदन आहे. तर हे गाणं प्रिया आणि राहूल सिपलिगंजने गायले आहे. श्री चरण पकाला यांनी या गाण्याला म्युजिक दिले आहे.प्रिया ‘श्रीदेवी बंगला’ आणि ‘लव्ह हॅकर्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये इंट्री करणार आहे. 

सनीलाही लाजवेल असं प्राजक्ताचं 'जबरी' फोटोशुट

काही वर्षांपूर्वी तिचा ‘ओरु अदार लव्ह’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचे एक गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावेळी प्रियाच्या डोळ्यांचा कटाक्ष लोकप्रिय झाला होता. काही तासांतच त्याला लाखो हिटस मिळाले होते. तो चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता.  प्रिया आता आणखी एका खास कारणामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. या चर्चा तिचे नवे गाणे प्रदर्शित झाल्यामुळे सुरु झाल्या आहेत.

 
 

loading image