इंस्टाग्रामवरील एका पोस्टसाठी प्रियांका, विराट घेतात कोट्यावधी रुपये..

priyanka virat
priyanka virat

मुंबई-  सेलिब्रिटींना कोणत्या गोष्टीसाठी किती पैसा मिळेल हे सांगता येत नाही. आता हेच पाहा ना सोशल मिडियावर जिथे सामान्य माणूस वेळ घालवण्यासाठी सक्रिय असतो तिथे सेलिब्रिटी त्यांच्या एका पोस्टने देखील कोट्यावधी रुपयांची कमाई करतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही इंस्टाग्रामवर सगळ्यात जास्त कमाई करणा-या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. २०१९ मध्ये इंस्टाग्रामवर सगळ्यात जास्त कमाई करणा-या सेलिब्रिटींमध्ये दोन भारतीय सेलिब्रिटींच्या नावाचा समावेश आहे.

होय. प्रियांका चोप्रा आणि विराट कोहली हे दोघं या यादीमध्ये समाविष्ट असणारे दोन भारतीय सेलिब्रिटी आहेत.  hopperhq वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी इंस्टाग्रामवर कमाई करणा-या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. या लीस्टमध्ये प्रियांका चोप्रा २८ व्या नंबरवर आहे. तर भारतीय क्रिकेटर विराट कोहली तिच्या दोननंबर आधी म्हणजेच २६ व्या नंबरवर आहे. गेल्या वर्षी प्रियांका १९ व्या नंबरवर होती. तर विराट कोहली २३ व्या नंबरवर होता.

अभिनेत्री प्रियांका चोप्राला एका पोस्टचे जवळपास २.१५ कोटी रुपये मिळतात. तर विराट कोहलीला इंस्टाग्रामवर एक पोस्ट करण्यासाठी २.२१ कोटी रुपये मिळतात. गेल्या वर्षी देखील या लीस्टमध्ये केवळ दोन भारतीय सेलिब्रिटींचा समावेश होता. या लीस्टमध्ये पहिल्या नंबरवर फास्ट एँड फ्युरिअस स्टार ड्वेन जॉनसन, तर दुस-या नंबरवर काईली जेनर आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

In my new miniseries with BAZAAR.com, I open up my little @cameron.rains @davidvoncannon @ralphlauren

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

या लीस्टच्या तिस-या नंबरवर फुटबॉल खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो, चौथ्या नंबरवर किम कार्दशियन आहे. पाचव्या नंबरवर एरियाना ग्रांडे, सहाव्या नंबरवर सेलेना गोमेज, सातव्या नंबरवर बियॉन्से नोल्स, आठव्या नंबरवर जस्टिन बिबर, नवव्या नंबरवर टेलर स्विफ्ट आणि दहाव्या नंबरवर फुटबॉलर नेयमार ज्युनियर आहेत.   

priyanka chopra and cricketer virat kohli are the only two indians in instagram rich list 2019  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com