सुशांतच्या केसमध्ये नवं वळण, पोलीस करणार दिग्दर्शक संजय लीला भन्साळींची चौकशी..

bhansali sushant
bhansali sushant

मुंबई- बॉलिवूडमधील मोठ्या निर्मिती कंपन्यांनी सुशांतवर बंदी घातल्याची चर्चा रंगली असताना पोलिसांनी प्रसिद्ध दिग्दर्शन संजय लिला भन्साळीला चौकशीसाठी समन्स पाठवला होता. याप्रकरणी भन्साळी यांचा जबाब सोमवारी नोंदवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली 

सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी आत्महत्या केली. तो नैराश्यावर ट्रीटमेंट देखील घेत होता. सुशांत नेमका कोणत्या कारणांमुळे नैराश्यात होता याचा तपास आता पोलिस करत आहेत. या प्रकरणात आत्तापर्यंत २८ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये असे रिपोर्ट्स आले होते की संजय लीला भन्साळी त्यांच्या ४ सिनेमात सुशांतला कास्ट करणार होते. यातील दोन सिनेमे आधीच रिलीज झाले आहेत. मात्र आयत्यावेळी सुशांतला कास्ट करण्यात आलं नसल्याचं कळतंय. पोलिसांना हे जाणून घ्यायचं आहे की असं का केलं गेलं? सुत्रांच्या माहितीनुसार पोलीस संजय लीला भन्साळींसोबतंच शेखऱ कपूर आणि कंगना रनौत यांचे जबाब देखील नोंदवण्यासाठी त्यांना बोलवण्याची शक्यता आहे.

संजय लीला भन्साळींना त्यांच्या रामलीला आणि बाजीराव मस्तानी या सिनेमात सुशांतला कास्ट करण्याची इच्छा होती. यासाठी तेव्हा त्यांनी सुशांतसोबत बातचीत देखील केली होती. मात्र त्यावेळी सुशांत यशराज बॅनरच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये बांधला गेला होता.

विशेष म्हणजे हे दोन्ही सिनेमे त्या अभिनेत्याला मिळाले जो त्यावेळी यशराज फिल्म्ससोबत कॉन्ट्रॅक्टमध्ये होता. मात्र यशराज फिल्म्सने त्याला सूट दिली होती. या बातम्यांवर भन्साळींना हे सांगून पूर्णविराम दिला होता की त्यावेळी तारखांच्या अडचणींमुळे हे होऊ शकलं नाही. पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, भन्साळींची चौकशी केल्यानंतर पोलीस पुन्हा एकदा यशराज फिल्म्सच्या कास्टिंग डिरेक्टरला जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्याची शक्यता आहे.  

मुंबई पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. आत्महत्ये मागची सर्व कारणे पडताळणी जात आहेत.   या प्रकरणात आतापर्यंत 27 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.  सुशांतसिंग राजपूतच्या कुटुंबीयांना पुन्हा जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले आहे.सुशांतच्या आर्थिक गुंतवणूक व कंपनीत रिया चक्रवर्ती हिलाही पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुशांतसोबत शेवटात म्हणजेच ‘दिल बेचारा’ मध्येकाम करणारी अभिनेत्री संजना सांघीला पोलिसांनी चौकशीसाठी समन्स केले होते. पोलिसांनी संजनाला सोमवारी चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते. मात्र शुटींगच्या तारखेत व्यस्त असल्यामुळे संजनाने पोलिसांना मंगळवारी चौकशीला हजर राहिली. पोलिसांनी तब्बल 7तास तिची चौकशी केल्यानंतर तिला जाऊ दिले. काही महिन्यांपूर्वी 'मी-टू कैम्पेन' सुरू असताना संजनाने सुशांतवर तिची छेड काढल्याचा आरोप केला होता. त्यावेळी तिने सुशांतसोबत चॅटचे फोटो ही सोशल मिडियावर  टाकल्याचे कळते.  त्यावेळी सुशांतने या आरोपाचे खंडन केले होते.
मंगळवारी सुशांतची बहिण आणि त्याचा मित्र महेश शेट्टी यांनी तपास अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचे ही कळते. दोघांनी सुशांतच्या आत्महत्येचे कारण काही स्पष्ट झाले आहे का हे जाणून घेतल्याचे कळते. त्याच बरोबर सुशांतने आत्महत्या केलेल्या घरात तो भाड्याने रहात होता. त्या घराचे भाडे लाखोरुपये आहे. त्यामुळे ते घर म्हणजे च सुशांतच्या त्या घरातील वस्तू घेऊन ते घर खाली करण्याबाबत पोलिसांकडे परवानगी मागितली आहे.  त्याच बरोबर सुशांतचे जे बँक अकांऊन्ट पोलिसांनी बंद केले आहेत. ते सुरू करण्याबाबत ही पोलिसांकडे विनंती केल्याचे कळते.

sushant singh rajput death case mumbai police will inquire sanjay leela bhansali  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com