Priyanka chopra: 'बाळाला जन्म देण्यासाठी मी सरोगसीची मदत घेतली कारण..', प्रियंका अखेर बोललीच Priyanka's Baby girl Malti Marie | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka Chopra and Nick Jonas with her Baby girl Malti Marie

Priyanka chopra: 'बाळाला जन्म देण्यासाठी मी सरोगसीची मदत घेतली कारण..', प्रियंका अखेर बोललीच

Priyanka chopra: प्रियंका चोप्रा आणि निक जोनस बॉलीवूडपासून हॉलीवूड पर्यंत सगळ्यांचेच फेव्हरेट कपल आहेत. या दोघांनी आपल्या पहिल्या अपत्याचं म्हणजे मुलगी मालती मेरीचं स्वागत जानेवारी २०२२ मध्ये सरोगसीच्या सहाय्यानं केलं होतं. आता आपल्या मुलाखतीत प्रियंकानं आपण सरोगसीच्या मदतीनं मुलीला जन्म का दिला याचा खुलासा केला आहे.

प्रियंकानं सरोगसीच्या माध्यमातून मुलीला जन्म देण्याचा निर्णय का घेतला याविषयी सविस्तर काही सांगितलं नसलं तरी तिनं हे नक्कीच सांगितलं की हा निर्णय मेडिकल इश्यूजमुळे घेतला गेला. प्रियंका चोप्रा म्हणाली,''मी काही मेडिकल कॉम्प्लिकेशन्सचा सामना करत होते''.

त्यामुळे आमच्यासाठी हा निर्णय गरजेचा होता. मी या गोष्टीनं खूश आहे की मी ते करु शकले आणि तो माझ्यासाठी योग्य निर्णय ठरला. आमची सरोगेट खूपच प्रेमळ,धमाल आणि मजेदार होती. तिनं आमच्या या खास गिफ्टचं तब्बल सहा महिने सांभाळ केला.(Priyanka Chopra and Nick Jonas with her Baby girl Malti Marie)

हेही वाचा: Madhuri च्या ड्युप्लिकेटचा सोशल मीडियावर धुमाकूळ..धकधक गर्लचे पती श्रीराम नेनेही होतील कन्फ्यूज..

मालती मेरीच्या जन्माची घोषणा केल्यानंतर प्रियंका चोप्राला ट्रोल केलं गेलं. खूप नेटकऱ्यांना प्रियंकानं सरोगसीच्या सहाय्यानं मुलीला जन्म देण्याची गोष्ट खटकली होती. खूप उलट-सुलट चर्चा त्यावेळी रंगल्या. काही लोकांनी तर तर्क असा देखील लावला की प्रियंका आणि निक आपल्या व्यस्त शेड्युलमुळे मुलाला जन्म देऊ शकले नाहीत.

याअफवेनंतर प्रियंका चोप्रानं म्हटलं की, ''लोक मला प्रत्यक्षात ओळखत नाहीत. त्यांना माहित नाही मी कोणत्या गोष्टींचा माझ्या आयुष्यात सामना केला आहे. मी माझी मेडिकल हिस्ट्री किंवा माझ्या मुलीची मेडिकल हिस्ट्री सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर सांगू शकत नाही''.

''आम्हाला हे देखील माहित नव्हतं की आमची मुलगी जिवंत राहिल की नाही''

. मुलीच्या जन्मानंतर प्रियंका आणि निकने तब्बल तीन महिने कॅलिफोर्नियाच्या रेडी चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये चकरा मारल्या. याच हॉस्पिटलच्या NICU मध्ये मालतीला भरती केलं गेलं होतं. त्यानंतर लॉस एंजलिसच्या Cedars-SInai हॉस्पिटलमध्ये मालतीला ठेवलं गेलं होतं.

हेही वाचा: Rakhi Sawant नंतर आता शर्लिन चोप्रानं टार्गेट केलं सलमान खानला, खिल्ली उडवत म्हणाली...

प्रियंका पुढे म्हणाली, ''माझी मालगी जेव्हा जन्माला आली तेव्हा मी ऑपरेशन रुममध्येच होती. ती खूप छोटी होती,माझ्या हातापेक्षाही छोटी. निक आणि मी तिथेच होतो जेव्हा मालतीला मशीन लावलं जात होतं. मला ते पाहून खरंच डॉक्टरांचे करावे तितके कौतूक कमी असं वाटतं''.

आम्ही आमचा प्रत्येक दिवस तिच्यासोबत घालवला. कधी माझ्या छातीशी बिलगलेली असायची तर कधी निकच्या. मला तेव्हा माहित नव्हतं ती वाचेल की नाही.

प्रियंका पुढे म्हणाली,''मला नेहमीच माझ्या मुलीची चिंता लागून राहिलेली असते. पहिल्यांदा मी तिला काहीतरी भरवलं तेव्हा ते तिच्या गळ्यात अडकलं होतं. मला वाटलं मीच तिचा जीव घेतला. माझ्या कुटुंबानं तेव्हा मला खूप धीर दिला. ते म्हणाले,मुलाच्या गळ्यात कधी कधी जेवण असं अडकतं. पण माझी मुलगी NICU मध्ये होती त्यामुळे माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती. मला यातून बाहेर यायचं आहे आणि मी तसा प्रयत्न करत आहे''.

प्रियंका पुढे म्हणाली,''जेव्हा मालती खात असते तेव्हा तिच्या आजुबाजूला सात जणं तरी असतात. माझी आई,भाऊ आणि निकचे भाऊ ,त्याचे आई-वडील''.

प्रियंका पुढे म्हणाली,''अनेकजण म्हणतात मालती निक सारखी दिसते पण मला तसं नाही वाटत''.