आणखी किती निर्भया होण्याची वाट पाहणार, कायदा सुव्यवस्था ''मूक'' का आहे ; प्रियंका चोप्राचा संताप

युगंधर ताजणे
Thursday, 1 October 2020

प्रसिध्द अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने आपल्या सोशल अकाऊंटवरुन देशाच्या कायदा सुव्यवस्थेवर बोट ठेवले आहे. पीडितेला न्याय मिळावा यासाठी तिने इन्स्टाग्रामवर आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. चार नराधमांनी १९ वर्षीय मुलीचा बलात्कार करुन तिच्यावर अत्याचार केला. यासगळ्या प्रकरणावर कायदा सुव्यवस्था शांत का झाली आहे, असा प्रश्न  प्रियंकाने विचारला आहे. 

मुंबई - उत्तर प्रदेशातील हाथरस याठिकाणी घडलेल्या घटनेमुळे संबंध देशातुन हळहळ व्यक्त केली जात आहे. अद्याप पोलिसांकडुन आरोपींना अटक न केल्यामुळे स्थानिक जनतेने पोलिसांवर हल्ला केल्याचे दिसुन आले. पोलिसांनी तातडीने त्या नराधमांना गजाआड करावे अशी मागणी केली जात आहे. दुसरीकडे देशाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रावरही त्याचा परिणाम होत आहे.

२९ सप्टेंबर रोजी हाथरस घडलेली घटना त्याचा सर्वस्तरांतुन निषेध व्यक्त केला जात आहे. या अमानुष कृत्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी बॉलीवूडमधील कलाकार पुढे आले आहेत. प्रसिध्द अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने आपल्या सोशल अकाऊंटवरुन देशाच्या कायदा सुव्यवस्थेवर बोट ठेवले आहे. पीडितेला न्याय मिळावा यासाठी तिने इन्स्टाग्रामवर आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. चार नराधमांनी १९ वर्षीय मुलीचा बलात्कार करुन तिच्यावर अत्याचार केला. यासगळ्या प्रकरणावर कायदा सुव्यवस्था शांत का आहे, असा प्रश्न  प्रियंकाने विचारला आहे.

हेही वाचा;ममता कुलकर्णी ते दीपिकापर्यंत; बॉलीवूड आहे एमडीचे शिकार; हे एमडी आहे तरी काय?

हाथरस मधील घटना पाहुन प्रचंड राग आणि चीड येत आहे. संताप होत आहे. दु;ख आणि आपण असहाय्य असल्याची भावना जाणवत आहे. अशा प्रकारची कृत्ये पुन्हा पुन्हा होत आहेत. बलात्कारा मागोमाग बलात्कार होत राहतात. यात नेहमीच महिला, लहान मुली यांना आपला जीव गमवावा लागतो. त्यांच्यावरचा अन्याय कमी होत नाही. हे सगळे होत असताना प्रशासन काय करते, कायदा सुव्यवस्था मूग गिळून गप्प का आहे असा सवाल तिने केला आहे. 

सुशांत प्रकरणात नाव घेतल्याने अरबाज खानने यूजर्स विरोधात दाखल केला मानहानीचा दावा

त्या पीडितेचा उपचार घेत असताना मृत्यु झाला. दिल्लीच्या  सफदरजंग येथील रुग्णालयात त्या पीडितेवर उपचार सुरु होते. यापूर्वी स्वरा भास्कर, कंगना रणौत, मीरा चोप्रा, रिचा चड्ढा, रितेश देशमुख, अक्षय कुमार यांसारख्या अनेक कलाकारांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली होती. या घटनेचे तीव्र पडसाद राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रावर उमटले. अनेकांनी दोषींवर तातडीने कारवाईची मागणी केली आहे. तसेच देशाची राजधानी सुरक्षित नसल्याचे काहींनी म्हटले आहे.

यासगळ्या परिस्थितीवर प्रसिध्द दिग्दर्शक फरहान अख्तर याने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. हाथरसची घटना म्हणजे देशावरील न पुसला जाणारा डाग आहे. असे म्हणुन त्याने आपली उद्विग्नता मांडली आहे. हाथरसमध्ये घडलेली घटना अतिशय भयानक आहे. यामुळे मन विषण्ण झाले आहे. अमानुषपणे त्या मुलीवर अत्याचार करणा-यांना अटक करुन पीडीतेच्या कुटूंबियांना न्याय द्यावा. असे अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने म्हटले आहे. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Priyanka Chopra asks 'Is the law mute to the screams?' as she pens moving note on Hathras rape victim's death