Priyanka Chopra: 'माझ्याशी लग्न करशील'? किंग खानचं प्रपोझ, काय म्हणाली होती प्रियांका?

बॉलीवूडमध्ये शाहरुखसोबत काम करणं ही अनेक अभिनेत्रींची इच्छा असते. त्याला प्रियंका अपवाद नव्हती.
Priyanka chopra birthday when shahrukh khan proposed
Priyanka chopra birthday when shahrukh khan proposedesakal

Priyanka chopra birthday when shahrukh khan proposed : किंग खान शाहरुख आणि प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांच्यातील प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा झाली होती. कुणालाही वाटले नव्हते की, या सेलिब्रेटींमधील प्रेमाची गोष्ट लग्नापर्यत येऊन ठेपेल. बॉलीवूडमध्ये एसआरके आणि प्रियंकाची लवस्टोरी नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे.

बॉलीवूडमध्ये शाहरुखसोबत काम करणं ही अनेक अभिनेत्रींची इच्छा असते. त्याला प्रियंका अपवाद नव्हती. शाहरुखसोबत तिनं डॉन २ मध्ये काम केले होते. तेव्हापासून दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. आणि त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले होते. त्या दोघांना एकमेकांना डेट करत असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर झाली होती. वेगवेगळ्या सिनेमासिकांमधून देखील त्याविषयी लिहिले गेले होते.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

बॉलीवूडमधून आता हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री झालेल्या प्रियंकाचा चाहतावर्ग मोठा आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ चित्रपटविश्वात कार्यरत असणाऱ्या प्रियंकानं बॉलीवूडपासून फारकत घेत हॉलीवूडची वाट धरली. आज प्रियंका तिचा ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. ऑस्करच्या स्वागत समितीमध्ये देखील प्रियंकाच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. यावरुन तिचा हॉलीवूडमध्ये असलेला दरारा दिसून येतो. प्रियंकाचे बॉलीवूडमधील किस्सेही तिच्या बर्थ डे च्या निमित्तानं व्हायरल झाले आहेत.

प्रियंका ही नेहमीच तिच्या ठाम भूमिकेसाठी ओळखली गेली आहे. तिनं यापूर्वी वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया देत अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या प्रियंका आणि किंग खान यांच्या लग्नाच्या बातमीची चर्चा होत आहे. प्रियंकानं शाहरुख सोबत बिल्लू आणि डॉनमध्ये काम केले होते. तेव्हापासून त्यांचे नाव घेतले जाऊ लागले. एका कार्यक्रमामध्ये शाहरुखनं तिला लग्नासाठी प्रपोझही केले होते.

त्या कार्यक्रमामध्ये शाहरुख प्रियंकाला म्हणतो की, मॅरी मी....मॅरी मी...प्रियंका त्याच्याकडे पाहते आणि हसते...असा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख आणि प्रियंका यांच्यातील वाढत्या मैत्रीची चर्चा शाहरुखची पत्नी गौरी पर्यत गेली होती. त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. तेव्हा गौरीचा मित्र करण जोहरनं हे प्रकरण मिटवले होते. असेही म्हटले जाते. आणि प्रियंकानं हॉलीवूडची वाट धरली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com