Priyanka Chopra : संपत्ती, फेम अन् जगभरात अनोखी ओळख तिची! मात्र जगाला दिसते त्यापेक्षा प्रियंका फारच वेगळी...

प्रियंकाचा आज वाढदिवस. वयाच्या 41 व्या वर्षात तिनं पदार्पण केलंय.
Priyanka Chopra Birthday
Priyanka Chopra Birthdayesakal

Priyanka Chopra Birthday Special : कधी हॉलीवू़ड तर कधी बॉलीवूडमध्ये स्वत:च्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर भूरळ पाडणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा. संपत्ती, फेम आणि ग्लॅमरने वेढलेलं तिचं आयुष्य. मिस वर्ल्डचा मुकुटही तिने कमी वयातच तिच्या नावी केला होता.

प्रियंकानं बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये स्वत:ची हटके झलक चाहत्यांना दाखवली. त्यामुळेच बॉलीवूडमध्ये आजही तिचं नाव चर्चित अभिनेत्रींच्या यादीत आहे. प्रियंकाचा आज वाढदिवस. वयाच्या 41 व्या वर्षात तिनं पदार्पण केलंय. तिचं फिटनेस अन् सौंदर्य बघता वय हा फक्त एक आवडा असतो हे सिद्ध होतं.

मात्र प्रियंकानं एका मुलाखतीत आजवर चाहत्यांना माहिती नसलेल्या एका विषयावर चर्चा केली. संपत्ती, फेम अन् जगभरात प्रियंकाची आज वेगळी ओळख आहे.मात्र ज्या अभिनेत्रीची जगभरात कायम चर्चा असते त्या अभिनेत्रीला पार्टी करायला आवडत नाही असे तिने सांगितले.

Priyanka Chopra Birthday
Priyanka Chopra: साऊथ इंडियाचं माहीत नाही पण प्रियंका चोप्रा बेअर ग्रील्स बरोबर नक्की झळकणार!

एका मुलाखतीत बोलताना ती म्हणाली होती की," मी परंपरावादी पार्श्वभूमीतून आली आहे. वयाच्या १७ व्या वर्षी मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी प्रियंका असंही म्हणाली होती की, आज बॉलीवूड आणि हॉलीवूडच्या स्क्रिनवर ती ज्या कुठल्या भूमिकेत दिसते त्यावरून माझ्या साधेपणावर कोणालाच विश्वास बसणार नाही. लोक तिच्याबाबत जसा विचार करतात त्यापेक्षा ती फार वेगळी आहे असेही ती म्हणाली. (Priyanka Chopra)

२००४ मध्ये प्रियंकाला एका मुलाखतीत तिच्याबद्दल जगाला माहिती नसलेल्या तीन गोष्टी शेअर करण्यास सांगितल्या होत्या. त्यावेळी ती म्हणाली होती की, "मला पार्टी करायला अजिबात आवडत नाही. मी चित्रपटांमध्ये ज्याप्रमाणे बोल्ड पोषाख परिधान करते किंवा अभिनय करते तो माझ्या कामाचा एक भाग आहे. पण कदाचित माझा लुक आणि अभिनय बघून लोकांना त्यावर विश्वास बसणार नाही. लोकांचा माझ्याबद्दल असलेल्या समजापेक्षा मी फार वेगळी आहे." असे तिने या मुलाखतीत स्पष्ट केले होते. (Entertainment)

प्रियंकाने हॉलीवूडपर्यंत मजल मारली असली तरी तिला हिंदी कविता फार आवडतात. तिचे आवडते कवी एमिली डिकिन्सन, फैज साहेब आणि गालिब हे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com