Priyanka Chopra: प्रियंकाला सोडा तिचा बॉडीगार्ड बघा, बॉडीगार्डचा लूक पाहून चाहते फिदा Bollywood Actress | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka chopra Bodyguard Video viral

Priyanka Chopra: प्रियंकाला सोडा तिचा बॉडीगार्ड बघा, बॉडीगार्डचा लूक पाहून चाहते फिदा

Priyanka Chopra: देशी गर्ल प्रियंका चोप्रा ३ वर्षा नंतर माहेरी आली म्हणजेच भारतात आली आहे. ती भारतात आली की तिच्या चाहत्यांसाठी दसरा दिवाळीपेक्षा मोठा सणअसतो. पण आता प्रियंकापेक्षा तिचा बॉडीगार्ड जास्त चर्चेत आला आहे. (Priyanka chopra Bodyguard Video viral)

हेही वाचा: Big Boss Marathi 4: घराच्या काचा फुटेपर्यंत मारामाऱ्या, बिग बॉसच्या घरात हाणामारी

प्रियंका चोप्रा सध्या भारतात आली आहे. ती तिच्या हेअर प्रोडक्टचे प्रमोशन करण्यासाठी आली आहे. प्रियंका मुंबईतील ताज हॉटेलमध्ये दिसली. यादरम्यान प्रियंकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावेळी प्रियंकापेक्षा तिच्या बॉडीगार्डवर सर्वांच्या नजरा रोखल्या आहेत.

हेही वाचा: Big Boss Marathi 4: घराच्या काचा फुटेपर्यंत मारामाऱ्या, बिग बॉसच्या घरात हाणामारी

प्रियंका मुंबईतील ताजमध्ये दिसली जिथे संपूर्ण मीडिया तिला कव्हर करण्यासाठी पोहोचला होता. यावेळी प्रियंकाच्या सोबत तिचा बॉडीगार्ड होता, जो खूपच स्टायलिश आहे. बॉडीगार्ड प्रियंकाला मीडियापासून दूर ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता. अशा परिस्थितीत बॉडीगार्डची अदा, स्टाईल, लूकने सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. सगळीकडे फक्त प्रियंकाच्या बॉडीगार्डचीच चर्चा होत आहे. एवढेच नाही तर प्रियंकाच्या चाहत्यांनी बॉडीगार्डबद्दल भरभरून कमेंट दिल्या आहेत.

एका यूजरने लिहिले - 'प्रियंकाचा बॉडीगार्ड रायन रेनॉल्ड्ससारखा दिसत आहे'. दुसरीकडे, दुसर्‍या युजरने त्याला डेडपूलसारखे संबोधले आहे. त्याचवेळी आणखी एका यूजरने म्हटले की, 'प्रियंकाने बॉडीगार्डही अमेरिकेतून आणला आहे की काय? .