'व्हेंटिलेटर'ला पुरस्कार मिळाल्याने प्रियांका भावूक

वृत्तसंस्था
रविवार, 9 एप्रिल 2017

प्रियांका चोप्रा आणि तिची आई मधू चोप्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

मुंबई : 'व्हेंटिलेटर' चित्रपटाला शुक्रवारी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याचे समजताच अभिनेत्री प्रियांका चोप्रा भावूक झाली.

प्रियांकाने हा चित्रपट आपल्या वडिलांच्या स्मृतीनिमित्त बनवला होता. त्याला तीन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होताच वडिलांची प्रकर्षाने आठवण झाली, असे प्रियांकाने सांगितले. 'व्हेंटिलेटर' हा चित्रपट गतवर्षी प्रदर्शित झाला होता. राजेश मापुसकरने तो दिग्दर्शित केला होता.

प्रियांका चोप्रा आणि तिची आई मधू चोप्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. राजेश मापुसकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, आलोक डे यांना सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्‍सिंग आणि रामेश्‍वर भगत यांना सर्वोत्कृष्ट संकलक असे तीन राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाला जाहीर झाले. ही आनंदाची बातमी परदेशात असलेल्या प्रियांकाला कळताच ती कमालीची भावूक झाली.

Web Title: priyanka chopra emotional as ventilator wins award