esakal | कोरोना रूग्णांसाठी 'देसी गर्ल'ने जमवला पाच कोटींचा निधी

बोलून बातमी शोधा

Priyanka Chopra
कोरोना रूग्णांसाठी 'देसी गर्ल'ने जमवला पाच कोटींचा निधी
sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोरोना रूग्णांच्या मदतीसाठी बॉलिवूडची देसी गर्ल म्हणजेच प्रियांना चोप्राने Priyanka Chopra नुकतेच एक अभियान सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत तिने कोरोना रूग्णांच्या मदतीसाठी निधी उभारण्याचे काम हाती घेतले आहे. प्रियांकाने तिच्या संस्थेते मार्फत कोरोना रूग्णांसाठी 'गिव्ह इंडिया’ Give India नावाचे ऑनलाइन फंड रेज़िंग कॅम्पेन सुरू केले होतो. या अभियानामध्ये निधी देण्याची विनंती प्रियांकाने लोकांना केली . प्रियांकाच्या या कार्य़ाला आर्थिक मदत करत अनेक लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. (priyanka chopra give india campaign collects five crore rupees fund)

प्रियांकाच्या या अभिनायानामध्ये जवळपास पाच कोटींचा निधी जमा झाला आहे. प्रियांकाचे पती निक जोनासने देखील सोशल मीडियावर या संस्थेला निधी देण्याचे आवाहन केले आहे. निकने एक ट्विट केले होते. यामध्ये त्याने ‘गिव्ह इंडिया’ या प्रियांकाच्या फंड रेज़िंग कॅम्पेनची लिंक शेअर केली आहे. तसेच निकने ट्विटमध्ये लिहीले आहे, ‘भारताला आपली गरज आहे. शक्य तितकी मदत करा.’ निकच्या या ट्विटला चांगला प्रतिसाद मिळाला. प्रियांका आणि निकच्या या मदतकार्याचे सर्वजण कौतुक करत आहेत. त्यांच्या या मदतकार्यात अमेरिकेच्या अनेक कलाकारांनी सहभाग घेतला. शॉन मेंडेस, कमिला कॅबेलो या प्रसिद्ध गायकांनी देखील प्रियांकाच्या या कार्याला चांगला प्रतिसाद दिला. अमेरिकेचे अध्यक्ष बायडन यांनी देखील प्रियांकाच्या या कार्याला मदत करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. या अभियानामध्ये जमा झालेल्या निधीच्या रक्कमेची अधिकृत घोषणा प्रियांका लवकरच करणार आहे. वैद्यकीय सुविधांसाठी हा निधी वापरला जाणार आहे.

हेही वाचा : कंगनाला टिव-टिव भोवली; ट्विटर अकाऊंट केलं सस्पेंड

प्रियांका सध्या अमेरिकेत तिच्या पती सोबत राहत आहेत. भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सुरू असलेल्या हाहाकारामुळे तिने भारताला आर्थिक मदत करण्यासाठी हे अभियान सुरू केले आहे.