esakal | 'भारताला आपली गरज', जावईबापूंना सासरची काळजी

बोलून बातमी शोधा

Priyanka chopra husband nick Jonas
'भारताला आपली गरज',जावईबापूंना सासरची काळजी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना सध्या देश करत आहे. रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने अनेक रूग्णालयात वैद्यकिय सुविधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशावेळी बॉलिवूडमधील कलाकरांनी मदत कार्य हाती घेतले आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या पती निक जोनस सोबत अमेरिकेत राहात आहे. तिने देशातील सर्व समस्या पाहून या कठिण वेळी देशातील नागरिकांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रियांकाने तिच्या संस्थेते मार्फत कोरोना रूग्णांसाठी गिव इंडिया’ ‘नावाचे ऑनलाइन फंड रेज़िंग कॅम्पेन सुरू केले आहे. यामधून ती लोकांना आर्थिक मदत करण्याची विनंती करत आहे. प्रियांकाने सुरू केल्या या मदत कार्यात निक जोसनने देखील सहभाग घेतला आहे. निकने नुकतेच एक ट्विट केले आहे. यामध्ये त्याने ‘गिव इंडिया’ या प्रियांकाच्या फंड रेज़िंग कॅम्पेनची लिंक शेअर केली आहे. तसेच निकने ट्विटमध्ये लिहीले आहे, ‘भारताला आपली गरज आहे शक्य तितकी मदत कारा’ निकच्या या ट्विटला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच प्रियांका आणि निकच्या या मदत सर्वजण कौतुक करत आहेत.

बॉलिवूडमधील अनेक कालाकार रूग्णालयांना मदत करत आहेत. अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्नाने नुकतेच 200 पेक्षा जास्त ऑक्सीजन वेंटीलेटर्स रूग्णालयांना दिले आहेत. तसेच भूमि पेडनेकर, तापसी पन्नू, स्वरा भास्कर, मनोज बाजपेयी, सुशांत सिंह, विनीत कुमार सिंह या कलाकारांनी देखील मदत केली आहे. बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगणने दादरच्या शिवाजी पार्क येथील भारत स्काऊट आणि गाईडच्या हॉलमध्ये एक इमर्जन्सी युनिट स्थापन केले आहे. भारत स्काऊट आणि गाईडच्या या हॉलमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी २० बेड लावले आहेत.