esakal | भन्नाट! 'मेहंदी लगा के रखना'चं ऐका इंग्रजी व्हर्जन
sakal

बोलून बातमी शोधा

actress priyanka chopra

भन्नाट! 'मेहंदी लगा के रखना'चं ऐका इंग्रजी व्हर्जन

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये (bollywood) असे काही चित्रपट आहेत ज्यांच्याविषयी नेहमी चर्चा असते. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (DDLJ) हा बॉलीवूडमधील सर्वोत्तम 100 चित्रपटांमध्ये गणला जातो. या चित्रपटानं भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. आजही अनेक प्रेक्षकांना या चित्रपटाच्या अनेक आठवणीनं नॉस्टॅल्जिक व्हायला होतं. आता दिलवाले दुल्हनियाची आठवण येण्याचं कारण म्हणजे या चित्रपटातील एका गाण्यांचं इंग्रजी व्हर्जन व्हायरल झालं आहे. त्यावर प्रियंकानं दिलेली रिअॅक्शन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. (Priyanka Chopra Instagram video share on social media DDLJ yst88)

1995 मध्ये दिलवाले दुल्हनिया प्रदर्शित झाला होता. अजूनही त्याचा प्रभाव प्रेक्षकांच्या मनावर आहे. या चित्रपटातील गाणी, संवाद खास चर्चेचा विषय आहे. 25 वर्षांनंतरही दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मधील गाणी प्रेक्षकांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये अॅड आहे. जय सीननं या गाण्यांचं इंग्रजी व्हर्जन तयार केलं आहे. ते सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्यामुळे त्याला चांगली पसंती मिळताना दिसत आहे.

मात्र या गाण्याचं इंग्रजी व्हर्जन जेव्हा प्रियंका चोप्रानं ऐकलं तेव्हा तिनं डोक्यालाच हात लावला. तिला हसू आवरलं नाही. तिचीही याबद्दलची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. जय सीन हा त्याच्या क्रिएटिव्हीटीसाठी प्रसिद्ध आहे. तो त्याच्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. आताही त्याच्या त्या व्हिडिओला युझर्सची पसंती मिळाली आहे.

हेही वाचा: माफी मागा, 25 कोटींची भरपाई द्या; शिल्पाची माध्यमांविरोधात याचिका

हेही वाचा: 'आता हा शेवट आहे', प्रख्यात दिग्दर्शक अनुराग असं का म्हटला?

प्रियंकाच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचं झाल्यास, ती शेवटी द व्हाईट टायगर नावाच्या चित्रपटामध्ये दिसली होती. प्रियंकाचं आता स्वताचं प्रॉडक्शन हाऊस आहे. त्याचं नाव पर्पल पेबल्स पिक्चर्स असं आहे. त्या प्रॉडक्शनच्या माध्यमातून तिनं आतापर्यत व्हेंटिलेटर, सर्वन, पाहुना, फायरबँड, पानी, द स्काय इज पिंक, द व्हाइट टायगर नावाचे चित्रपट बनवले आहे.

loading image
go to top