प्रियांका चोप्रासारखं सौंदर्य हवं असेल तर पाहा स्वतः प्रियांकाने दिलेल्या ब्युटी टिप्स

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 April 2020

लॉकडाऊनमुळे ब्युटी पार्लर बंद असताना घरच्या घरी आपल्या केसांची काळजी कशी घेता येईल हे प्रियांका तिने शेअर केलेल्या व्हिडिओमधून सांगत आहे. 

मुंबई ः कलाकार मंडळी सध्या घरबसल्या काय करतात हे त्यांच्या चाहत्यांना सहज कळतंय ते सोशल मीडियामुळेच. सध्या चित्रीकरण रखडलं असताना प्रेक्षकांच मनोरंजन करण्यासाठी कलाकारांकडेही सोशल मीडिया हे एकमेव माध्यम उरलं आहे. विविध व्हिडिओज्, फोटोज्, पोस्ट शेअर करत ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. काहींनी तर चक्क घरात बसून लघुपटही तयार केला आहे. इतकंच काय तर घरच्या घरी वर्कआऊट, योगा, डान्स करत कलाकार इतरांना प्रोत्साहीत करत आहे. आता अभिनेत्री प्रियांका चोप्राने तर ब्युटी टिप्स शेअर करणं सुरु केलं आहे. लॉकडाऊनमुळे ब्युटी पार्लर बंद असताना घरच्या घरी आपल्या केसांची काळजी कशी घेता येईल हे प्रियांका तिने शेअर केलेल्या व्हिडिओमधून सांगत आहे. 

हे ही वाचा ; चालू कार्यक्रमात जया बच्चन ऐश्वर्याला बोलल्या होत्या असं काही की एॅशला लगेचंच आलेलं रडू 

नैसर्गिक सौंदर्य हवं असेल तर घरगुती उपाय कधीही चांगले असे बोललं जातं. प्रियांका देखील घरी उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून हेअर पॅक बनवत आपल्या केसांची काळजी घेत आहे. दही, अंड आणि मध यापासून तिने हा हेअर पॅक बनवलेला आहे. हा घरगुती हेअरपॅक केसासाठी फारच उपयुक्त असल्याचेही प्रियांका सांगत आहे. `क्वारंटाईनवेळात अशाप्रकारचे विविध प्रयोग करुन पाहणं अगदी योग्य आहे. ही रेसिपी हेअरपॅकची आहे. जी माझ्या आईने मला शिकवली. आणि माझ्या आईला तिच्या आईने शिकवली.` असे प्रियांका व्हिडिओ शेअर करताना सांगितले आहे. तिच्या या व्हिडिओला लाखोनी व्ह्यूज देखील मिळाले आहेत. 

प्रियांकाने यापूर्वीही काही ब्युटी टिप्स शेअर केल्या होत्या. सहज उपलब्ध होतील अशा वस्तूंपासून ती काही पॅक बनवत असते. आता क्वारंटाईनवेळात प्रियांका तिचा पती नीकबरोबरचे काही फोटोज् व्हिडिओज् शेअर करत असते. तिच्या या व्हिडिओजला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसादही मिळत आहे. 

priyanka chopra just shared her desi hair mask recipe


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: priyanka chopra just shared her desi hair mask recipe