प्रियंका करणार बालचित्रपट 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या पर्पल पेबल पिक्‍चर्स बॅनरअंतर्गत तीन बालचित्रपटांची निर्मिती केली जाणार आहे. हे चित्रपट सिक्किमी, कोंकणी व हिंदी भाषेत असणार आहेत. "पहुना' (सिक्किमी), "लिटील जो कहॉं हो' (कोंकणी आणि हिंदी), "अलमसर' (हिंदी) अशी या चित्रपटांची नावे आहेत. या तिन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन महिला दिग्दर्शक करणार आहेत. या वर्षात हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. 

"आतापर्यंत लहान मुलांवर कमी चित्रपट बनले आहेत. त्यामुळे आता आम्ही लहान मुलांच्या चित्रपटांच्या दुनियेत पाऊल टाकत आहोत. लहान मुलांचे जगामध्ये निरागसता, प्रेम व उत्साह पाहायला मिळतो. आगामी बालचित्रपटांबाबत मी खूपच उत्सुक आहे. बालचित्रपटाची कथा लहानग्यांना भावणारी तर आहेच; शिवाय त्यातून एक संदेशही दिला जाणार आहे. या चित्रपटांच्या तिन्ही दिग्दर्शिकांबरोबर काम करण्यासाठी मी कमालीची उत्सुक आहे,' असे प्रियंकाने सांगितले. "पहुना'चे लेखन व दिग्दर्शन पाखी टायरवाला यांनी केले. ही कथा माओवाद्यांच्या आंदोलनादरम्यान नेपाळहून सिक्कीमला स्थलांतरित होताना आई-वडिलांपासून दुरावलेल्या तीन नेपाळी मुलांची आहे. कोंकणी व हिंदी भाषेतील "लिटील जो, कहॉं हो' याचे लेखन व दिग्दर्शन सुवर्णा नसनोडकर यांनी केले. प्रसिद्ध कार्टुनिस्ट आर. के. लक्ष्मण, मारियो मिरांडा यांना या चित्रपटाद्वारे श्रद्धांजली वाहली आहे. हिंदी चित्रपटाचे शीर्षक अद्याप निश्‍चित झालेले नाही. मात्र, ही कथा एक लहानगा आणि कुत्रा यांच्यातील मैत्री व प्रामाणिकपणाभोवती गुंफलेली आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन लॉरा मिश्रा यांनी केले आहे.' 
 
Web Title: priyanka chopra kids movie direct now