Video : प्रियांकाच्या डीपनेक ड्रेसवर आई म्हणाली...

Untitled-4.jpg
Untitled-4.jpg
Updated on

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा मागच्या काही दिवसांपासून ग्रॅमी अवॉर्डमध्ये घातलेल्या ड्रेसमुळे चर्चेत आहे. या अवॉर्डमधील प्रियांकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि या ड्रेसमुळे तिला ट्रोल व्हावं लागलं. आता प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी या प्रकरणामध्ये आपल्या मुलीची बाजू घेत ट्रोलर्सला जोरदार उत्तर दिले आहे.

प्रियांका चोप्रानं ग्रॅमी अवॉर्ड सोहळ्यात डीपनेक ड्रेस परिधान केला होता. पण या ड्रेसची नेकलाइन बेंबी पर्यंत डीप होती. ज्यामुळे बॉलिवूडच्या देसी गर्लला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं गेलं. परदेशात जाऊन प्रियांका देशातले संस्कार विसरली अशी टीका तिच्यावर केली जात होती. पण आता तिची आई मधू चोप्रा यांनी मात्र आपल्या मुलीचं समर्थन करत तिच्यावर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

प्रियांकावर टीका करणाऱ्यांनी मधू चोप्रा यांनी अनोळखी म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना मधू चोप्रा म्हणाल्या, “ते तिचं शरीर आहे. तिला सुंदर शरीराची देणगी मिळाली आहे. त्या शरीराबरोबर ती काहीही करु शकते. इतकचं मी सांगू शकते,'' इतकचं नाही तर तो ड्रेस पाहिल्यानंतर आपण प्रियांकाला “तुझं आयुष्य तुझ्या पद्धतीने जग,” असा मेसेजही पाठवल्याचे मधू यांनी सांगितलं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

So proud of this fam. Congratulations @jonasbrothers you guys crushed it today. #grammys

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

ट्रोलर्सवर निशाणा साधत मधू चोप्रा पुढे म्हणाल्या, ट्रोल करणारे स्वतःच्या आयुष्यात आनंदी नाहीत त्यामुळेच ते अशाप्रकारे घाणेरड्या गोष्टी करुन दुसऱ्यांवर अशा वाईट कमेंट करुन स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मी अशा लोकांवर लक्ष कधीच देत नाही. हा ड्रेस घालण्याआधी प्रियांकानं मला त्याचं सॅम्पल दाखवलं होतं आणि मला माहित होतं की हा ड्रेस घालणं तिच्यासाठी रिस्की असू शकतं. पण हा काही सुंदर ड्रेसपैकी एक ड्रेस होता.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Tassel fun. #grammys

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

फॅशन डिझायनर वेंडेल रॉड्रिक्सने प्रियांकाच्या ड्रेसच्या नेकलाइनच्या लांबीवरुन तिची खिल्ली उडवत त्याला, ‘लॉस एंजेलिस ते क्यूबा’ असं म्हटलं होतं. त्याच्या या कमेंटनंतर युजर्सनी रॉड्रिक्सलाही ट्रोल केलं होतं. काही लोकांनी रॉडिक्सनं प्रियांकाला बॉडी शोमिंगसाठी ट्रोल केल्याचं म्हटलं होतं. ज्यानंतर त्यानं मी तिच्या ड्रेस बद्दल बोललो बॉडीबद्दल नाही असं स्पष्टीकरण दिलं होतं.

प्रियांकानं निकसोबत ग्रॅमी 2020च्या रेड कार्पेटवर फॅशन डिझायनर राल्फ अँड रुशोच्या डिझायनर ड्रेसमध्ये एंट्री केली होती. या इव्हरी व्हाइट गाऊनची हायलाइट होती त्याची लॉन्ग नेकलाइन. ही नेकलाइन खूपच रिव्हिलिंग होती. ज्यामुळे प्रियांका सोशल मीडियावर खूप ट्रोल झाली. या ड्रेसमधील फोटो प्रियांकानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर हा ड्रेस आतापर्यंत तिचा सर्वात वाईट ड्रेस असल्याचं म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com