न्यूयाॅर्क हल्ला : प्रियांकाने वाहिली श्रद्धांजली

बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

न्यूयाॅर्क : अमेरिकेत झालेल्या दुर्घटनेत आठ जण मृत्यूमुखी पडले. एका माथेफिरू इसमाने टेम्पोने आठ जणांना चिरडलं. वर्ल्ड ट्रेड सेंटरजवळच हा प्रकार घडल्याने अमेरिकेत घबराट उडाली आहे. न्यूयाॅर्कच्या महापौरांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलं आहे.

जगभरातून या घटनेचा निषेध होत असतानाच त्यात आता अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहतानाच आपलं घरही घडल्या घटनेपासून केवळ पाच इमारती पलिकडे होतं असं म्हटलं आहे. या घटनेबद्दल संताप व्यक्त करतानाच, असे प्रकार घडू नयेत म्हणून देवाकडे प्रार्थनाही केली आहे. 

Web Title: priyanka chopra newyork twitter esakal news