
जिमी फॉलनच्या 'द टुनाइट शो'मध्ये प्रियांकाने या घटनेचा खुलासा केला.
बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी 'देसी गर्ल' अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने 'अनफिनिश्ड' या नावाने आत्मचरित्र प्रकाशित केलं. या बायोग्राफीमध्ये प्रियांकाने तिच्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्याविषयी बरेच खुलासे केले आहेत. २००० मध्ये तिने मिस वर्ल्डचा किताब जिंकत करिअरमधील मोठं यश संपादित केलं होतं. मात्र या स्पर्धेपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक प्रसंगाचा खुलासा प्रियांकाने केला आहे.
जिमी फॉलनच्या 'द टुनाइट शो'मध्ये प्रियांकाने या घटनेचा खुलासा केला. "स्पर्धेच्या वेळी तिथे जवळपास ९० मुली होत्या, ज्या बॅकस्टेज इथे - तिथे फिरत होत्या. सर्वांची हेअरस्टाइल आणि मेकअपची गडबड सुरू होती. त्याचवेळी मी माझे केस कर्ल (कुरळे) करत असताना एकीचा धक्का लागला. माझ्या केसांची बट जळाली आणि कपाळालाही चटका बसला होता. कपाळावरचा डाग मी मेकअपने लपवण्याचा प्रयत्न केला, पण जळालेल्या केसांचं मी काहीच करू शकत नव्हते. अखेर ती बट तशीच ठेवत स्टाइल असल्यासारखं दाखवलं," असं प्रियांकाने सांगितलं.
हेही वाचा : प्रिया बापटलाही लागलं 'पावरी'चं याड; पाहा धमाल व्हिडीओ
हेही वाचा : बाळाच्या जन्माआधी करीनाची चाहत्यांसाठी महत्त्वपूर्ण पोस्ट
सौंदर्यस्पर्धेदरम्यान कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं आणि ऐनवेळी अशा घटना घडल्यास युक्त्या वापरून त्यातून पुढे जावं लागतं, याची शिकवण त्या घटनेतून मिळाल्याचं प्रियांकाने सांगितलं. याआधीही प्रियांकाने तिच्या वॉर्डरोब मालफंक्शनचा किस्सा सांगितला होता. मात्र फॅशन शोदरम्यान अत्यंत चलाखीने तिने ते लपवण्याचा प्रयत्न केला होता.