
सर्वसामान्यांना तर या ट्रेण्डने वेड लावलंच, पण आता सेलिब्रिटीसुद्धा या ट्रेण्डमध्ये उतरण्याचा मोह आवरू शकले नाहीत.
सोशल मीडियावरील 'पावरी हो रही है' हा ट्रेण्ड माहित नाही असा क्वचित कोणीतरी असेल. एका मुलीने पोस्ट केलेला हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की त्यावरून असंख्य मीम्स, फोटो व व्हिडीओ तयार केले जाऊ लागले. सर्वसामान्यांना तर या ट्रेण्डने वेड लावलंच, पण आता सेलिब्रिटीसुद्धा या ट्रेण्डमध्ये उतरण्याचा मोह आवरू शकले नाहीत. दीपिका पदुकोण, शाहिद कपूर यांनी 'पावरी' ट्रेण्डचा मीम व व्हिडीओ पोस्ट केला. त्यानंतर आता मराठीतील आघाडीची अभिनेत्री प्रिया बापट हिनेसुद्धा ट्रेण्डमध्ये उडी घेतली आहे.
प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. फोटोशूटदरम्यान प्रियाने तिच्या सहकाऱ्यांसोबत 'पावरी' ट्रेण्डचा धमाल व्हिडीओ शूट केला असून त्यावर नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.
हेही वाचा : 'जात महत्त्वाची नसून..'; रिंकू राजगुरूची पोस्ट चर्चेत
काय आहे पावरी ट्रेण्ड?
पाकिस्तानमधील कंटेट क्रिएटर दानानीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओत ती 'ये मे हूँ, ये हमारी कार है और ये हमारी पावरी हो रही है' असं बोलताना दिसतेय. पार्टी या शब्दाला ती ज्याप्रकारे पावरी म्हणते, ते पाहून नेटकऱ्यांना मीम्स बनवण्याचा मोह आवरला नाही. या ट्रेण्डचा नेटफ्लिक्स, डॉमिनॉज, झोमॅटो यांसारख्यांनीही फायदा घेतला आणि मजेशीर मीम्स तयार केले.
हेही वाचा : बाळाच्या जन्माआधी करीनाची चाहत्यांसाठी महत्त्वपूर्ण पोस्ट
यशराज मुखातेचा व्हिडीओ व्हायरल
'रसोडे मे कौन था' या संवादाचा मजेशीर रॅप बनवणारा यशराज मुखाते यानेसुद्धा 'पावरी' ट्रेण्डवर रिमिक्स गाणं तयार केलं. यशराजचं हेचं गाणं गात प्रिया बापटने तिचा 'पावरी' व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने यशराजचंही कौतुक केलं आहे.