Priyanka Chopra at  Jio MAMI Mumbai Film Festival 2023
Priyanka Chopra at Jio MAMI Mumbai Film Festival 2023 Esakal

MAMI Film Festival: MAMI फिल्म फेस्टिव्हलसाठी प्रियांका पोहोचली भारतात! गळ्यातील मंगळसूत्राने वेधलं लक्ष..

मुंबईत होणाऱ्या Jio MAMI फिल्म फेस्टिव्हलसाठी प्रियांका चोप्रा भारतात पोहोचली आहे.

Priyanka Chopra At Jio MAMI Film Festival: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिची फॅन फॉलोविंग केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आहे. भारतातील देसी गर्लने आता परदेशात तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.

प्रियंकाने निक जोनाससोबत लग्न केल्यानंतर ती आता अमेरिकेत राहते. मात्र कामानिमित्त ती भारतातही अनेकदा येत असते. आता देखील प्रियंका भारतात पोहचली आहे.

Priyanka Chopra at  Jio MAMI Mumbai Film Festival 2023
Amala Paul Engaged: भोला फेम अमाला पॉलनं उरकला साखरपूडा! कोण आहे होणारा नवरा?

मुंबईत आयोजित करण्यात येत असलेल्या Jio MAMI फिल्म फेस्टिव्हलसाठी प्रियांका भारतात आली आहे. 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या Jio MAMI मुंबई फिल्म फेस्टिव्हलची ओपनिंग नाईट प्रियंका होस्ट करणार आहे.

यासाठी देसी गर्ल प्रियंका मुंबईत पोहोचली. तिला शुक्रवारी मुंबई विमानतळावर पापाराझींनी स्पॉट केले. यावेळी प्रियंकाने सर्वांना अभिवादन केले आणि त्याचे आभार मानले. यावेळी तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Priyanka Chopra at  Jio MAMI Mumbai Film Festival 2023
Malaika Arora Video Viral : मलायकाच्या पायावर हे डाग कसले, तिला नक्की काय झालंय?

शुक्रवारी सकाळी मुंबई विमानतळावर प्रियंका खुपच ग्लॅमरस दिसत होती. तिने लांब काळ्या श्रगमध्ये सोबत काळा क्रॉप टॉप आणि जॉगर्स परिधान केली होती. स्टेटमेंट नेकलेस, फ्री हेअरस्टाइलसह तिने लुक पूर्ण केला. तिने परिधान केलेल्या मंगळसूत्रावर तिची मुलगी मालतीचे नाव लिहिलेले दिसते. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

Priyanka Chopra at  Jio MAMI Mumbai Film Festival 2023
Subramanian Swamy on Kangana: "महिला फक्त सेक्ससाठी नाहीत तर...", कंगनाने सुब्रमण्यम स्वामींचे टोचले कान

27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) येथे होणार्‍या प्रतिष्ठित Jio MAMI फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी प्रियंका मुंबईला आली आहे.

Jio MAMI मुंबई फिल्म फेस्टिव्हलची ओपनिंग नाईट प्रियांका चोप्रा ही ईशा अंबानीसोबत होस्ट करणार आहेत. यामध्ये सोनम कपूर आहुजा, फरहान अख्तर, झोया अख्तर, सिद्धार्थ रॉय कपूर, राणा डग्गुबती आणि इतर बॉलिवूड सेलिब्रिटीही हजर राहणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com