वयाच्या ८व्या वर्षी प्रियंकाला लागलेली मातृत्वाची ओढ; आईकडे धरला होता हट्ट Priyanka chopra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka chopra

वयाच्या ८व्या वर्षी प्रियंकानं धरला होता आई बनण्याचा हट्ट;काय घडलेलं नेमकं?

प्रियंका चोप्रा (Priyanka chopra) काही महिन्यांपूर्वीच सरोगसीच्या माध्यमातून आई बनली आहे. प्रियंकाला लहान मुलं खूप आवडतात हे सर्वप्रचलित आहे. आता आई बनल्यानंतर तर ती अधिकच खूश दिसून येत आहे. प्रियंका आपली स्टायलिस्ट कृष्णाच्या मुलीच्या अधिक जवळ आहे. ती अनेकदा त्या लहानगीसोबतचे फोटो शेअर करताना दिसते. पण एक माहित आहे का एक वेळ होती जेव्हा प्रियंकाला आई बनायचं होतं. आणि तेव्हा फक्त तिचं वय हे ८ वर्षांचं होतं आणि त्या वयात तिनं आईला ही इच्छा बोलून दाखवली होती. आता नेमंक काय प्रकरण आहे हे सगळं याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

हेही वाचा: अजय देवगण-सलमान खानची फोनवर झाली चर्चा, मोठा निर्णय घेतल्याचा खुलासा

तर त्याचं असं आहे की,प्रियंकाला आई बनायचं होतं पण एका दत्तक मुलीची. तिनं आपली आई मधु चोप्रा यांना हे सांगितलं होतं. प्रियंकानं याविषयी आपल्या पुस्तकात लिहीलं आहे. प्रियंका म्हणलीय,''एके दिवशी ती उठली आणि तिनं पाहिलं तर घरात काहीतरी कुजबुज सुरू होती. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा प्रियंकाच्या लहान भावाचा १९८९ साली नुकताच जन्म झाला होता. प्रियंकानं पाहिलं आईच्या बाजूला एक बाळ आहे. प्रियंकानं विचारताच आईनं सांगितलं की,आई जेव्हा डिलीव्हरीनंतर हॉस्पिटलमधून घरी परतत होती तेव्हा एका बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. कोणीतरी त्या लहान बाळाला त्यांच्या गाडीच्या खाली सोडून दिलं होतं. त्या रात्री,प्रियंकानं त्या लहान बाळाला आपल्या जवळच ठेवायचाच निर्णय घेतला होता पण आईनं विरोध केला. आई म्हणाली,ते असं करू शकत नाहीत''.

हेही वाचा: 'केजीएफ2' यशला हिंदीत प्रदर्शित करायचा नव्हता,सचिन गोळे होता म्हणून...

प्रियंका पुढे म्हणाली,''तिच्या आईनं त्या लहान बाळाला एका अशा जोडप्याला दिलं ज्यांना मुलबाळ नव्हतं. त्या मुलीला माझ्या मांडीवर घेतलं आणि काही वेळ तिच्याशी खेळल्यानंतर मग त्या जोडप्याला सुपूर्द केलं. खूप कायदेशीर प्रक्रिया व्हायची बाकी होती,पण मला याबाबत माहित नव्हतं. मी त्या बाळाला हातात घेतल्यावर त्या जोडप्याच्या चेहऱ्यावर जो आनंद पाहिला होता तो आजतागायत मी विसरु शकत नाही. त्या दोघांच्या डोळयातनं आनंदाश्रू वाहत होते. खूप काही आज हरवलेलं गवसलं त्याचा आनंद होता तो''.

हेही वाचा: कोण होणार कंगनाच्या 'लॉकअप' चा विजेता कैदी? उत्सुकता शिगेला...

प्रियंका सध्या लॉस एंजेलिसमध्ये राहते आणि पती निक जोनस तसंच मुलीसोबत वेळ घालवत आहे. प्रियंकानं आपल्या मुलीचं नाव मालती मेरी असं ठेवलं आहे. प्रियंका आता लवकरच फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या सिनेमात प्रियंकासोबत आलिया भट्ट आणि कतरिना कैफ महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.

Web Title: Priyanka Chopra Wanted To Be A Mother At The Age Of 8 What

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top