प्रियंका चोप्रानं मुलीसंदर्भात घेतला मोठा निर्णय, पहिल्यांदाच एक आई बोलली...Priyanka Chopra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka Chopra during a chat with Lilly Singh.

प्रियंका चोप्रानं मुलीसंदर्भात घेतला मोठा निर्णय, पहिल्यांदाच एक आई बोलली..

गेल्या वर्षाच्या अखेरीस प्रियंका चोप्रा(Priyanka Chopra) आणि निक जोनस(Nick Jonas) एका गोंडस मुलीचे आई-बाबा झाले आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. प्रियंकानं तसं अधिकृत रित्या आपण सरोगसीच्या माध्यमातून आई बनल्याचं जाहिर केलं होतं. पण इतके महिने झाले तरी अद्याप प्रियकानं आपल्या मुलीचा चेहरा कुणालाच दिसणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली आहे. इतकंच नाही तर मुलीविषयी चकार शब्द देखील तिनं काढला नाही कुठे. पण आता पहिल्यांदाच तिनं मुलीविषयी घेतलेला एक मोठा निर्णय जाहिरपणे बोलून दाखवला आहे. काय म्हणालीय प्रियंका चोप्रा तिच्या मुलीविषयी?

पहिलं मुल प्रत्येक आई-वडिलांसाठी स्पेशल असतं. कारण ते आपल्या आई-वडिलांना एक सन्मानाची पदवीच जणू बहाल करत असतं. प्रत्येक पालकाला पहिल्यांदा आई-बाबा झाल्यावर तशा सन्मानाच्या भावनाही मनात जागरुक होतातच. आई आणि बाबा होणं यापेक्षा जगात दुसरा कोणताच आनंद नाही किंवा यापेक्षा दुसरी कोणतीच पदवी ग्रेट नाही असं प्रत्येकाला त्याक्षणी वाटतं. पण त्यातनंच कधीकधी अपेक्षा आपल्या मुलावर किंवा मुलीवर त्यांच्या जन्मापासूनच नकळत लादल्या जातात. तसं आईवडिलांचं करणं चुकीचं असतं असं नाही पण त्यात आपलं मुल भरडलं जाऊ नये हा मुद्दा लक्षात घेणं देखील महत्त्वाचं असतं. म्हणूनच माझ्या अपेक्षा, माझी स्वप्न,एखादी गोष्ट करण्याविषयीची माझी भीती यापैकी कोणतीही गोष्ट मी मुलीवर लादणार नाही असं मोठं विधान मुलीच्या जन्मानंतर अगदी सहा महिन्याच्या आतच प्रियंकानं केलं आहे.

हेही वाचा: Bhool Bhulaiyaa 2 teaser: 'रुह बाबा येतोय'; कार्तिक दिसला हटके अंदाजात

लिली सिंगनं तिच्या नव्या पुस्तकाच्या लॉंचिंगसाठी प्रियंकाला निमंत्रित केलं होतं. त्यावेळी तिनं प्रियंकाला पालक म्हणून तिचा प्रवास कसा असेल,तिचे विचार काय असतील,मुलीशी तिचं नात ती कसं ठेवणार याविषयी बोलतं केलं. आणि त्या कार्यक्रमात पहिल्यांदाच प्रियंकाना पालक म्हणून मुलीविषयी बोलणं पसंत केलं. ती म्हणाली, ''पालक म्हणून मी माझ्या इच्छा,आकांक्षा,अपेक्षा,भीती,मी जसे वाढले ती पद्धत माझ्या मुलीवर नक्कीच लादणार नाही. मी या गोष्टीवर विश्वास ठेवणारी आई आहे की, जन्म दिला म्हणून माझ्या मुलीवर माझा मालकी हक्क नसेल,मी फक्त एक माध्यम आहे माझ्या मुलीला घडवण्यासाठी. त्यात असं नसेल की ही माझी मुलगी आहे आणि आता मी मला हवं तसं तिला घडवेन. तसं मुळीच नसतं आणि माझ्याबाबतीत नसेलही. मुल तुमच्या माध्यमातून जन्माला येतं, पण त्याचं आयुष्य त्यालाच घडवायचं आहे. आपण फक्त त्याला सोबत करायची. आणि हेच वागणं मला माझ्या मुलीशी नातं सुदृढ करण्यात मदत करेल''.

हेही वाचा: Ranbir Alia wedding:दोन माणसांना उचलावा लागेल एवढा मोठा सोन्याचा बुके गिफ्ट

प्रियंकानं मुलीशी आपलं नातं कसं ठेवायचं याबद्दल घेतलेले निर्णय खरंच अनेकांना प्रोत्साहन तर देईल पण जर आपल्या आयुष्यात ते आपण उपयोगात आणले तर मुलांसोबतचं आपलं नातही सुखकर होईल यात शंकाच नाही. प्रियंका सध्या हॉलीवूड-बॉलीवूड अशा दोन्हीकडच्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. तिनं नुकतेच आपल्या 'टेक्स्ट फॉर यू' या सिनेमाचं आणि 'सिटाडेल' वेबसिरीजचं शूटिंग पूर्ण केलं आहे. फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या सिनेमातही ती कतरिना,आलियासोबत दिसणार आहे.

Web Title: Priyanka Chopras Big Dicision About Her

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top