
अमिताभ यांना रश्मिकाचं उलट उत्तर,'गूडबाय' च्या सेटवर घडला प्रकार
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला अल्लू अर्जूनचा(Allu Arjun) 'पुष्षा-द राइज' सिनेमानं बॉक्सऑफिसवर जेवढी आपली जादू दाखवली तितकंच सोशल मीडियावरही साऱ्यांना आपल्या प्रेमाचं वेड लावलं होतं. सिनेमातील संवादांपासून ते गाण्यांपर्यंत सर्वच गोष्टींवर अनेक रील्सचा खच सोशल मीडियावर पडलेला आपण साऱ्यांनीच पाहिला असेल. सिनेमातील मुख्य कलाकार अल्लु अर्जून आणि रश्मिका मंदाना(Rashmika Mandana) यांच्यावर तर चाहते फिदाच झालेयत. आता तर सिनेमातील श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदानाच्या फॅनलिस्टमध्ये दस्तुरखुद्द बॉलीवूडचे शहनशहा अमिताभ बच्चन(Amitabh Bachchcan) यांचाही समावेश झाला आहे.
हेही वाचा: भारताला कमी लेखणं Netflix ला भोवलं; सबस्क्रायबर्स संख्येत कमालीची घट
अमिताभ यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रश्मिका मंदानासोबतचा एक फोटो शेअर करीत त्याला कॅप्शन दिलं आहे की,''पुष्पा!'' तर रश्मिकानं यावर प्रतिक्रिया देताना लिहिलंय,''सर,हम झुकेगा नही''. ऱश्मिकाच्या या उत्तराने मात्र चाहत्यांनी अमिताभ यांची मस्करी केली आहे. रश्मिकानं उलट उत्तर दिलं म्हणून अमिताभ यांना आता वेगवेगळ्या प्रतिक्रियांना सामोरं जावं लागत आहे. सिनेमातला हा पंच डायलॉग खूपच व्हायरल झाला होता. जिथे पुष्पाच्या भूमिकेतला अल्लू अर्जुन एका विशिष्ट हावभावात ही संवादफेक करताना म्हणतो कसा,''नाम से फ्लॉवर समझे क्या,फायर है,मैं झुकेगा नही'. या सीनवर खूप मीम आणि इन्स्टाग्राम रील्स बनले होते. रश्मिकानं सिनेमात श्रीवल्ली ही व्यक्तिरेखा साकारली होती.
रश्मिका आता अमिताभ बच्चनसोबत 'गूडबाय' सिनेमात आपल्याला दिसणार आहे. या सिनेमाचं शूटिंग सध्या सुरूआहे. हा सिनेमा रश्मिकाचा दुसरा हिंदी सिनेमा आहे. 'गूडबाय' सिनेमाचं शूटिंग उत्तराखंड मध्ये ऋषिकेश और देहरादून मध्ये देखील पार पडलं आहे. 'गूडबाय' सिनेमाचं दिग्दर्शन विकास बहल यानं केलं आहे. तर सिनेमाची निर्माती आहे एकता कपूर. नीना गुप्ता,पावेल गुलाटी आणि सुनिल ग्रोव्हर यांनी सिनेमात महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.
हेही वाचा: अनुपम खेर यांच्या घरी निमंत्रणाशिवाय पोहोचले पंडित अन् पूजेचा घातला घाट
रश्मिका लवकरच आपल्याला सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू' सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा या वर्षीच १० जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे. 'मिशन मजनू' ही एक स्पाय फिल्म आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन शांतनु बागचीन यानं केलंय. 'पुष्पा' सिनेमामुळे रश्मिकाचे चाहते आता बॉलीवूडमध्येही मोठ्या संख्येनं आहेत. त्यामुळे याचा फायदा तिच्या 'मिशन मजनू' आणि 'गुडबाय' सिनेमांना होणार यात शंकाच नाही.
Web Title: Rashmika Mandannas Reply To Amitabh Bachchans On Goodbye Setread
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..