'बिग बॉस सिझन 14'चा प्रोमो प्रदर्शित; पनवेलच्या फार्म हाऊसमधून सलमान सहभागी 

संतोष भिंगार्डे
Sunday, 9 August 2020

'बिग बॉस 14' मध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. 14व्या सिझनसाठी विविध नावांचा अंदाज वर्तविला जात होता, पण त्यातील बर्‍याच जणांनी त्यांच्याकडे अशी कोणतीही विचारणा झाली नाही, असे सांगून ते नाकारले आहे.

मुंबई : भारतातील काही लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोजपैकी एक शो म्हणजे सलमान खानचा "बिग बॉस." या शोचे आतापर्यंत अनेक सीझन्स झाले आणि चर्चा सुरू झाली होती पुढच्या सीझनची. नुकताच "बिग बॉस 14" चा प्रोमो रिलीज झाला आहे.

सलमान खान लॉकडाऊनमध्ये पनवेल येथील फार्म हाऊसवर राहायला आहे. दरम्यान, आपल्या फार्म हाऊसवर शेतीची कामे करीत होता. ती कामे म्हणजे केवळ छंद म्हणून नव्हे तर बिग बॉस शोचाच एक भाग होता. आता यातील स्पर्धकांना शेती कशी करावी, तांदूळ कसे निवडावेत, याबाबत सलमान प्रश्न विचारणार आहे आणि त्यांना सांगणारही आहे. मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सलमान खान पनवेल फार्महाऊसमध्ये आपला वेळ घालवत आहे. तो आपले मित्र आणि कुटुंबीयांसह तेथे आहे.

चौदा वर्षांपूर्वी लोकलमध्ये त्यांचे पाकिट हरवले; अन् लॉकडाऊनमध्ये पोलिसांचा फोन आला की...

'बिग बॉस 14' मध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. 14व्या सिझनसाठी विविध नावांचा अंदाज वर्तविला जात होता, पण त्यातील बर्‍याच जणांनी त्यांच्याकडे अशी कोणतीही विचारणा झाली नाही, असे सांगून ते नाकारले आहे. निया शर्मा, व्हिव्हियन दशना, जसमीन भसीन, अविनाश मुखर्जी, अलिशा पवार, शेखर सुमन यांचा मुलगा अध्यायन सुमन आणि शगुन पांडे यांची नावे या कार्यक्रमाशी अनेकदा जोडली गेली आहेत. त्यामुळे आता या शो मध्ये कोणकोण असेल आणि काय ट्विस्ट असतील, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.   रोहित शेट्टीच्या "खतरों के खिलाड़ी : मेड इन इंडिया" हा शो संपल्यानंतर "बिग बॉस सिझन 14" हा शो सप्टेंबरमध्ये सुरू होईल असे म्हटले जात आहे.
----
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: promo of big boss season 14 gets releasedm, salman khan participated from panvel farm house