पुनीत राजकुमार यांच्या पत्नीची 'भावूक' पोस्ट; म्हणाल्या... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुनीत राजकुमार यांच्या पत्नीची 'भावूक' पोस्ट; म्हणाल्या...
पुनीत राजकुमार यांच्या पत्नीची 'भावूक' पोस्ट; म्हणाल्या...

पुनीत राजकुमार यांच्या पत्नीची 'भावूक' पोस्ट; म्हणाल्या...

मुंबई - आपल्या अभिनयाबरोबरच दातृत्वानं देखील लोकांच्या मनाचा ठाव घेणारे अभिनेते पुनित राजकुमार हे काही दिवसांपूर्वी कालवश झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुनित राजकुमार यांच्या जाण्यानं टॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या अंतिम दर्शनाला चाहत्यांनी लाखोंच्या संख्येनं गर्दी केली होती. त्यांनी आतापर्यत केलेल्या सामाजिक कामांची यादी आणि त्याविषयीची माहिती सोशल मीडियावर प्रसिद्ध होत होती. त्यातून बॉलीवूडच्या चाहत्यांनाही पुनित राजकुमार किती मोठं व्यक्तिमत्व आहे हे कळण्यास मदत झाली. आता पुनित राजकुमार यांच्या पत्नीची पोस्ट व्हायरल झाली आहे.

29 ऑक्टोबर 2021 ला पुनित राजकुमार यांना हदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचे निधन झाले. कन्नड चित्रपटसृष्टीमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारे अभिनेते म्हणून पुनित राजकुमार यांची ओळख होती. त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ केलेल्या अभिनयाच्या जोरावर लाखो चाहत्यांची मनं जिंकली होती. पावर स्टार अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी अश्विनी रेवनाथ, दोन मुली द्रिथी आणि वंदिथा असा परिवार आहे. सध्या पुनित यांच्या पत्नीची भावूक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

पुनित यांच्या पत्नीनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, मला चाहत्यांचे आभार मानायचे आहेत. त्यांनी ज्याप्रकारे पुनीत राजकुमार यांचं जाणं स्वीकारलं ते पाहून हदय हेलावून गेलं. त्यांनी आपल्या आवडत्या कलाकाराला मोठ्या आदरानं सन्मान दिला. त्यांच्या भावना मी समजू शकते. त्याचं जाण हे आमच्यासाठी देखील खूप शोकदायी आहे. पुनित राज हे त्यांच्या चाहत्यांसाठी पावर स्टार होते. मी लाखो चाहत्यांची खूप खूप आभारी आहे. त्यांनी आम्हाला केलेल्या सहकार्याबद्दल. मी जेव्हा लाखोचा समुदाय पाहिला तेव्हा वाटलं....आपण काही गमावलं नाही....पुनित राजकुमार हे त्यांच्या कार्याच्या माध्यमातून आपल्यातच आहेत. असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

loading image
go to top