
'Swayamvar Mika Di Vohti' या शोचा प्रवास फिनाले एपिसोडच्या जवळ येऊन पोहोचलाय.या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून मिका सिंग त्याची राजकुमारी शोधतोय.या शो मध्ये अखेर कोण होणार मिकाची बायको याचीच प्रेक्षकांना उत्सुकता लागलीय.या रिअॅलिटी शोच्या फिनाले एपिसोडला बराच वेळ असला तरी मिका सिंगने त्याच्या स्वप्नांची राजकुमारी आधीच फायनल केल्याचे कळते आहे.शो मधील सर्व मुलींपैकी या मुलीने मिका सिंगच्या दिलावर तिची छाप सोडलीय.(This Punjabi Girl will be Mika singh's wife)
मिकाच्या दिलाची राणी होणार का ही पंजाबी मुलगी ?
मिका सिंगच्या मनात स्वत:ची खास छाप सोडणाऱ्या या मुलीचं नाव आहे नीत महल. संपूर्ण शो मध्ये प्रत्येकवेळी मिका या मुलीवर फिदा असल्याचे दिसते आहे.चंदिगढची नीत पंजाबी घराण्यातली असल्याने एका पंजाबी मुलाला खाण्यात काय काय आवडतं याची नीतला चांगलीच माहिती आहे.नीतच्या अप्रतिम कुकिंग स्किल्सने मिका सिंगच्या मनात स्वत:चं खास स्थान निर्माण करण्यात नीत यशस्वी झाल्याचे दिसतेय.(she is winning heart of Mika Singh by cooking Skills)
चविष्ट जेवणाने जिंकले मिका सिंगचे मन
नीत ही प्रोफेशनल शेफ नसली तरी तिला चविष्ट जेवण बनवता येतं. एका एपिसोडमध्ये नीतने बनवलेली खीर फार चविष्ट होती म्हणत त्याने तिच्या कुकिंग स्किलचं भरभरून कौतुक केलं होतं.नीत शो मध्ये तिच्या स्वभावाने आणि कुकिंग स्किलने मिका सिंगच्या आणखी जवळ येताना दिसतेय. याआधी या दोघांनी एका म्युझिक व्हिडिओमध्ये सोबत काम देखील केले आहे.
एकिकडे शोमध्ये नीत मिकाच्या जवळ येताना दिसतानाच दुसरीकडे मिका सिंगची गर्लफ्रेंड म्हणून चर्चेत असणाऱ्या आकांक्षा पुरीची वाइल्ड कार्ड एंट्री शो मध्ये एन्ट्री झाली आहे. अखेर मिका सिंग कोणाला बनवणार दिलाची राणी आणि कोण जिंकणार मिकाचं मन याचीच प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.