पुष्कर ठरला बिगबॉसचा पहिला 'फायनलिस्ट'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जुलै 2018

चारपैकी दोन मत मिळून पुष्करला “टिकीट टू फिनाले” हे बिग बॉस कडून रिटर्न गिफ्ट मिळून थेट महाअंतिम फेरीमध्ये पोहोचणारा पहिला सदस्य ठरला. इतकेच नसून तो येणाऱ्या आठवड्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेमधून देखील सुरक्षित झाला आणि बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनचा शेवटचा कॅप्टन होण्याचा मान त्याला मिळाला असे बिग बॉस यांनी घोषित केले.

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल सदस्यांना बिग बॉस यांनी एक सुरेख सरप्राईझ दिले. मागील आठवड्यामध्ये झालेल्या WEEKEND चा डाव मध्ये सदस्यांनी केलेल्या आग्रहाखातर महेश मांजरेकरांनी मी नक्कीच एक दिवस घरामध्ये येईन असे सांगितले. आणि काल महेश मांजरेकर त्यांच्या पत्नीसोबत घरामध्ये आले.

सगळे सदस्य त्या दोघांना अचानक बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आलेले पाहून आनंदित झाले. मेधा मांजरेकर यांनी सदस्यांसाठी खास घरून काही गोष्टी बनवून आणल्या होत्या. काल बिग बॉस यांनी महेश मांजरेकरांच्या साक्षीने “टिकीट टू फिनाले” हे कार्य पार पडेल असे घोषित केले. ज्यामध्ये स्मिता, सई, पुष्कर आणि शर्मिष्ठाला “टिकीट टू फिनाले” कोणत्या सदस्याला मिळाले पाहिजे आणि का हे महेश मांजरेकर यांना सांगायचे होते. यामध्ये स्मिताने शर्मिष्ठाचे नावं घेतले तर शर्मिष्ठाने पुष्करचे. सईने पुष्करचे नाव घेतले तर पुष्करने सईचे नावं घेतले. अश्याप्रकारे चारपैकी दोन मत मिळून पुष्करला “टिकीट टू फिनाले” हे बिग बॉस कडून रिटर्न गिफ्ट मिळून थेट महाअंतिम फेरीमध्ये पोहोचणारा पहिला सदस्य ठरला. इतकेच नसून तो येणाऱ्या आठवड्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेमधून देखील सुरक्षित झाला आणि बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनचा शेवटचा कॅप्टन होण्याचा मान त्याला मिळाला असे बिग बॉस यांनी काल घोषित केले. आज WEEKEND चा डाव मध्ये काय होणार? उद्या कोण घराबाहेर पडणार? कोणाला प्रेक्षक सुरक्षित करणार ? हे बघायला विसरू नका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pushkar joag becomes first finalist of bigg boss