PVR INOX Cinema Screen : पीव्हीआर - आयनॉक्सच्या 50 स्क्रिन्स बंद होणार! काय आहे कारण?

देशभरामध्ये मल्टिप्लेक्स थिएटर्समध्ये पीव्हीआर आणि आयनॉक्सचा बोलबाला आहे. मात्र आता या कंपनीच्या बाबत एक मोठा निर्णय समोर आला आहे.
PVR INOX to Shut Down 50 Screens Soon
PVR INOX to Shut Down 50 Screens Soon

PVR INOX to Shut Down 50 Screens Soon : देशभरामध्ये मल्टिप्लेक्स थिएटर्समध्ये पीव्हीआर आणि आयनॉक्सचा बोलबाला आहे. मात्र आता या कंपनीच्या बाबत एक मोठा निर्णय समोर आला आहे. पीव्हीआर आयनॉक्सनं देशभरातील ५० थिएटर्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं त्याचे दिलेले कारण धक्कादायक आहे.

देशातील प्रमुख मल्टिप्लेक्स ऑपरेटर्स पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेडनं मोठी घोषणा केली आहे. कंपनीनं मे महिन्याच्या तिमाहीमध्ये त्यांना झालेल्या तोट्याविषयी सांगितले आहे. (PVR INOX to Shut Down 50 Screens) त्यातील आकडेवारी धक्कादायक असल्याचे समोर आले आहे. फायद्यापेक्षा आम्हाला तोट्याचीच भूमिका स्विकारावी लागत असल्याचे थिएटर्स चालकांनी सांगितले आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यामध्ये मोठा निर्णय घ्यावा लागत असल्याची माहिती पुढे आली आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

चौथ्या तिमाहीत ३३३ कोटींचा झाला तोटा...

मिळालेल्या माहितीनुसार, पीव्हीआर आयनॉक्सला चौथ्या तिमाहीमध्ये ३३३ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे म्हटले आहे. कंपनीनं डिसेंबरच्या तिमाहीमध्ये १६ कोटींचा फायदा झाल्याचे सांगितले आहे. एक वर्षापूर्वी मार्चच्या तिमाहीमध्ये कंपनीला १०५ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. जानेवारी मार्चच्या दरम्यान ३०.५ मिलियन प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यासाठी पीव्हीआर आयनॉक्सला भेट दिली होती. यासंबंधीचे वृत्त इकॉनॉमिक टाईम्सनं दिलं आहे.

168 नव्या स्क्रिन्स सुरु...

कंपनीनं सांगितलं की त्यांनी चालु आर्थिक वर्षात एकुण १६८ नव्या स्क्रिन्स सुरु केल्या आहेत. ज्यात पीव्हीआरच्या ९७ आणि आयनॉक्सच्या ७१ स्क्रिन्स आहेत. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात कंपनीनं एकुण ७९ स्क्रिन्स सुरु केल्या आहेत. त्यात पीव्हीआरच्या ५३ तर आयनॉक्सच्या २६ स्क्रिन्स आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com